रेल्वे, पूल आणि विमानळांवर अमेरिकेचे भीषण हल्ले, वीजपुरवठा खंडित, इराणमध्ये परिस्थिती घातक, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. त्यामध्येच रात्रभर अमेरिकेने इराणमध्ये हाहाकार माजवला आहे. इराणवर मोठे हल्ले अमेरिकेकडून केली जात आहेत. यादरम्यान रेल्वे मार्ग, पुल आणि विमानतळांना टार्गेट अमेरिकेने केले.

रेल्वे, पूल आणि विमानळांवर अमेरिकेचे भीषण हल्ले, वीजपुरवठा खंडित, इराणमध्ये परिस्थिती घातक, थेट..
US attack on iran
| Updated on: Jul 17, 2026 | 7:46 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्येच मोठे हल्ले केले जात आहेत. आखाती देशातील परिस्थिती गंभीर होत आहे. आता अमेरिकेने इराणवरील हल्ले अधिक तीव्र केली आहेत. अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला. हेच नाही तर अमेरिकेच्या निशाण्यावर होर्मुज खाडी आहे. होर्मुज खाडीत सलग दुसऱ्या दिवशी हल्ले झाली. अमेरिकेकडून सहाव्या दिवशीही इराणवर हल्ले करण्यात आलीत.  इराणकडूनही अमेरिकेच्या लष्कर तळांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. इराणच्या ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेने अब्बास बंदरच्या आजपासच्या गावांमध्ये असलेल्या विजांच्या लाईनला टार्गेट करत हल्ले केले. मात्र, त्यानंतरही तिथे परिस्थिती सामान्य होत आहे.

यादरम्यानच इराणी सैन्याने दावा केला की, त्यांनी बहरीन एअरबेस असलेल्या अमेरिकेच्या हेलिकॉप्टर आणि टोही विमानांना टार्गेट करून हल्ले केले. अमेरिकेने इराणच्या खामिर बंदराजवळीला पुलांना टार्गेट करून मोठे हल्ले केले. ज्यामध्ये काही लोक ठार झाले तर काही जखमी आहेत. यासोबतच अब्बास बंदरचा परिसर अल्लाहो अकबर येथेही अमेरिकेने मोठे बॉम्ब हल्ले केले.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात काही लोकांचे जीव गेले आहेत. अमेरिकेने अब्बास बंदर जवळीला रेल्वे मार्गाला टार्गेट करत हल्ले केले. हेच नाही तर अमेरिकेकडून आता इराण शहराच्या विमानतळालाही टार्गेट करण्यात आले. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे इराणच्या विमानतळाचे मोठे नुकसान झाले. सध्या पूर्ण देशात तणाव आहे.

कारण अमेरिकेकडून वीज, पुल, रेल्वे मार्ग आणि थेट विमानतळांना टार्गेट करून मोठ हल्ले केले जात आहेत. सलग 6 दिवसांपासून अमेरिकेचे हे हल्ले सुरू आहेत. इराणने होर्मुज खाडी बंद केली आहे. जोपर्यंत अमेरिका आमच्या 3 महत्वाच्या अटी मान्य करणार नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी खुली करणार नसल्याची भूमिका इराणची आहे. अमेरिकेने इराणला सळो की पळो करून सोडले आहे. दोन्ही देश मोठे हल्ले करताना दिसत आहेत.

Follow Us