AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : ट्रम्प म्हणाले पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र, पण त्यानंतर लगेच असं सुद्धा म्हणाले की..

Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल जगातल्या दोन बलाढ्य नेत्यांनी भरभरुन कौतुक केलं. एक म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन. मोदींवर दबाव टाकणं हानीकारक आहे, असं पुतिन म्हणाले.

Donald Trump : ट्रम्प म्हणाले पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र, पण त्यानंतर लगेच असं सुद्धा म्हणाले की..
Donald Trump-PM Modi
| Updated on: Jun 05, 2026 | 8:38 AM
Share

भारत आणि अमेरिकेत लवकरच व्यापार करार होणार आहे. त्याआधी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत, असं ट्रम्प म्हणाले. व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मला पंतप्रधान मोदी आवडतात. ते माझे चांगले मित्र आहेत. आमच्यात चांगलं नातं आहे. आम्ही लवकरच एक डील करणार आहोत” ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं असलं तरी ते हे सुद्धा म्हणाले की, “भारत अनेक वर्षांपासून अमेरिकी कंपन्यांवर जास्त टॅरिफ आकारतोय. भारतात अमेरिकी कंपन्यांवर मोठा टॅरिफ लावला जायचा. पण अमेरिकेकडून भारतीय कंपन्यांवर असं शुल्क आकारलं जात नव्हतं” रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सुद्धा पंतप्रधान मोदींचं कौतुक केलय.

भारत-अमेरिकेत व्यापार करारासंबंधी चर्चा सुरु असताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलय. या आठवड्यात अमेरिकी शिष्टमंडळ भारतात आलं होतं. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चार दिवस व्यापार करारावर चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली असं भारताच्या व्यापार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. भारत-अमेरिका दोन्ही देशांचं हित साधलं जाईल असा करार करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.व्यापार मंत्रालयानुसार दोन्ही देश व्यापार, आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र काम करतायत.

मोदींवर दबाव टाकणं हानीकारक

“रशिया सोबतचे भारताचे जे संबंध आहेत, सहकार्य आहे, त्यावरूनही अमेरिकेकडून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. पण आता हे सगळ्यांच्या लक्षात आलय की, जगतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आणि पीएम मोदींवर दबाव टाकणं हे आंतरराष्ट्रीय आणि द्विपक्षीय संबंधांसाठी हानीकारक आहे” असं पुतिन म्हणाले. भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यांचा प्रभावी आर्थिक विकास दर आहे असं पुतिन म्हणाले.

रशियाच्या दृष्टीने भारत एक विश्वासू मित्र

येणाऱ्या वर्षांमध्ये भारत-रशिया द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल असा विश्वास पुतिन यांनी व्यक्त केला.”रशियाच्या दृष्टीने भारत एक विश्वासू मित्र आहे. कुठल्याही अन्य देशांसोबतचे भारताचे द्विपक्षीय संबंध रशियाला नकारात्मक वाटत नाहीत. भारत एक महान लोकशाही प्रधान देश आहे. ते आपल्या राष्ट्रीय हितांची काळजी घेतात” असं पुतिन म्हणाले.

Follow Us
सगळं उद्ध्वस्त झालं! जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार, तब्बल 500...
सगळं उद्ध्वस्त झालं! जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार, तब्बल 500 वाहनं नदीत वाहिली
ब्राझीलला हरवत मिनर्व्हा अकादमीने जिंकला Gothia Cup 2026
भारताचा जागतिक डंका! ब्राझीलला हरवत मिनर्व्हा अकादमीने जिंकला Gothia Cup 2026
बंड करण्याआधी एकनाथ शिंदे माझ्यासोबत... संजय राऊतांनी सांगितला किस्सा
बंड करण्याआधी एकनाथ शिंदे माझ्यासोबत... संजय राऊतांनी सांगितला 'तो' किस्सा
धर्मेंद्र प्रधान धर्मात्मा नाहीत! संजय राऊतांचा थेट निशाणा
Sanjay Raut | धर्मेंद्र प्रधान धर्मात्मा नाहीत! संजय राऊतांचा थेट निशाणा, सरकारला कोंडीतच पकडलं
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंची सेना रस्त्यावर उतरणार!
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंची सेना रस्त्यावर उतरणार! मुंबईत आज मोर्चा
थेट लोकसभा सचिवालयातून अधिकृत पत्र अन्... ठाकरेंचे 6 फुटीर खासदार
थेट लोकसभा सचिवालयातून अधिकृत पत्र अन्... ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत मोठी अपडेट
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर
Sonam Wangchuk Health Update | सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला ऑडिओ
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल… संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर थेट टीका...

ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल… संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर थेट टीका..

अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची आग भडकली, देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार?.

अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची आग भडकली, देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार?

खासदार फुटीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे लोक सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर….

खासदार फुटीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे लोक सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर…

कोणाला सीता बनवलात? ‘रामायणम्’मध्ये साई पल्लवीच्या कास्टिंगवरून भडकला अभिनेता.

कोणाला सीता बनवलात? ‘रामायणम्’मध्ये साई पल्लवीच्या कास्टिंगवरून भडकला अभिनेता

देशात हुकूमशाही सुरू झालीय, भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात.

देशात हुकूमशाही सुरू झालीय, भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

अरे सोड रे शिंदे शिंदे काय चाललंय? शिंदे म्हणजे काय राममनोहर लोहिया आहेत का? की नेहरू आहेत? संजय राऊत संतापले.

अरे सोड रे शिंदे शिंदे काय चाललंय? शिंदे म्हणजे काय राममनोहर लोहिया आहेत का? की नेहरू आहेत? संजय राऊत संतापले