AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : इराणशी युद्धादरम्यान अमेरिकेचं पितळ उघड, या देशाने केली मोठी पोलखोल

मध्य पूर्वेतील युद्धात अमेरिकेचे स्पेनबद्दलचे खोटे दावे उघड झाले आहेत. व्हाईट हाऊसने स्पेन अमेरिकन सैन्याला सहकार्य करत असल्याचा दावा केला, पण स्पेनने तो लगेच फेटाळला. यावरून अमेरिकेचे पितळ उघड पडले. स्पेनने इराणवरील हल्ल्यांना विरोध केल्याने डोनाल्ड ट्रम्प संतापले असून त्यांनी व्यापारी संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. स्पेनने स्पष्ट भूमिका घेतल्याने अमेरिकेची कोंडी झाली आहे.

Iran Israel War : इराणशी युद्धादरम्यान अमेरिकेचं पितळ उघड, या देशाने केली मोठी पोलखोल
डोनाल्ड ट्रम्पImage Credit source: social media
| Updated on: Mar 05, 2026 | 8:39 AM
Share

इराण, इस्त्रालय आणि अमेरिकेमध्ये मोठ युद्ध सुरू असून त्याचा फटका जगातील अनेक देशांना बसताना दिसत आहे. याच युद्धादरम्यान आता, अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांन केलेल्या विधानाने खळबळ माजली आहे. स्पेनने अमेरिकन सैन्याला सहकार्य करण्यास सहमती दर्शवली आहे, असे लेव्हिट यांनी बुधवारी सांगितलं. अमेरिकन सैन्य स्पेनमधील त्यांच्या समकक्षांशी समन्वय साधत आहे, असंही त्यांनी नमूद केलं. मात्र, स्पेनने अलीकडेच इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांना विरोध केला होता. त्यामुळे व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीचं हे विधान येताच खळबळ उडाली, पण स्पेनने यावर लगेचच प्रतिक्रिया देत हाँ दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे अमेरिकेचं पितळ उघडं पडलं आहे.

“मी (व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याला) चुकीचं सिद्ध करू शकतो. मध्य पूर्वेतील युद्ध, इराणवरील बॉम्बहल्ला आणि आमच्या तळांचा वापर यावरील स्पॅनिश सरकारची भूमिका अजिबात बदललेली नाही,” असं स्पेनचे मंत्री जोस मॅन्युएल अल्बेरेस यांनी रेडिओ स्टेशन कॅडेना सेरला सांगितल्याचं वृत्त AP रिपोर्टदरम्यान दिलं आहे. स्पेनच्या या विधानामुळे अमेरिकेचाा खोटारडेपणा उघडकीस आला आहे.

स्पेनवर संतापले ट्रम्प

मंगळवारी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्पेनसोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याची धमकी दिली होती. दक्षिण स्पेनमधील अमेरिकेसोबतचा त्यांचा संयुक्त तळ, संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमध्ये समाविष्ट नसलेल्या हल्ल्यांसाठी वापरला जाणार नाही असं स्पेनने सांगितलं होतं. एवढंच नव्हे तर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनीही इराणमधील अमेरिका आणि इस्रायली लष्करी कारवाईवर टीका केली होती. मध्य पूर्वेतील युद्धामुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता.

असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, “आम्ही केवळ बदलाच्या भीतीपोटी जगासाठी वाईट आणि आपल्या मूल्यांच्या आणि हितसंबंधांच्या विरोधात असलेल्या गोष्टीत सहभागी होणार नाही,” असे सांचेझ यांनी दूरचित्रवाणीवरील भाषणात सांगितलं होतं. .

स्पेन वाईट पण जर्मनीचं कौतुक

मात्र स्पेनच्या या भूमिकेमुळे डोनाल्ड ट्रम्प स्पेनवर चांगलचे संतापले आणि त्यांनी स्पेनवर कर लादण्याची धमकी दिली. पुढे जाऊन त्यांनी डायरेक्ट जर्मनीचं कौतुक केलं. जर्मनीसारखे देश चांगले आहेत आणि आम्हाला सहकार्य करत आहेत, तर स्पेनसारखे देश वाईट आहेत, असं ट्रम्प म्हणाले होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...