AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काऊंटडाऊन सुरू… अवघ्या काही तासात जगातील एका महान सभ्यतेचा होणार अंत… अख्खा देशच होणार बेचिराख; ट्रम्प यांची पुन्हा धमकी

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणबाबत पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. इराणला गंभीर इशारा देताना त्यांनी इराणचा अंत करण्याची भाषा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काऊंटडाऊन सुरू... अवघ्या काही तासात जगातील एका महान सभ्यतेचा होणार अंत... अख्खा देशच होणार बेचिराख; ट्रम्प यांची पुन्हा धमकी
Trump IranImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 07, 2026 | 7:36 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणबाबत पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. इराणला गंभीर इशारा देताना त्यांनी म्हटले की, ‘परिस्थिती बदलली नाही तर आज रात्रीच एका प्राचीन सभ्यतेचा कायमचा अंत होऊ शकतो. आज रात्री एक संपूर्ण सभ्यता नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही. मला असे व्हावे असे वाटत नाही, पण कदाचित तसेच होईल. कदाचित काही क्रांतिकारी आणि अद्भुत घडू शकते, कोण जाणे काय होईल?’

इराणला गंभीर इशारा

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना ट्रंप यांनी हे विधान केले आहे. ट्रम्प यांनी होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी किंवा करार करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी 8 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. ट्रंप यांनी यापूर्वीही इराणला अश्मयुगात परत पाठवण्याची धमकी दिली होती, ज्याचा इराणने तीव्र निषेध केला होता. इराणने हा त्यांच्या 7000–8000 वर्षे जुन्या सभ्यतेवर हल्ला असल्याचे सांगत अमेरिकेलाही गंभीर इशारा दिला आहे.

ट्रम्प यांची ट्रूथ सोशलवर पोस्ट

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत लिहिले की, ‘एक संपूर्ण सभ्यता आज रात्री नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही. मला असे व्हावे असे वाटत नाही, पण कदाचित तसे होईल. आज रात्री आपल्याला कळेल, जे जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक असेल.’

रात्रीत काहीतरी भयंकर घडण्याची शक्यता

समोर आलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीची मुदत आज रात्री 8 वाजता संपणार आहे. याआधी ट्रम्प यांनी म्हटले होते की, जर त्या वेळेपर्यंत होर्मुज सामुद्रधुनी उघडली नाही, तर इराणला मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो. जर इराणने वेळेत समुद्री वाहतुकीसाठी होर्मुज उघडला नाही किंवा करार केला नाही, तर एका रात्रीत त्यांचा नाश करू शकतात. त्यामुळे आता आज रात्रीत इराणमध्ये काहीतरी भयंकर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Follow Us
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....