
नेपाळमध्ये सोशल मीडिया Apps वर बंदी घालण्यात आली आहे. त्या विरोधात राजधानी काठमांडूसह अनेक शहरात Gen-Z युवा वर्गाने उग्र हिंसक विरोध प्रदर्शन केलं. यावेळी शेकडो युवा थेट नेपाळी संसदेत घुसले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी आंदोलकांवर सुद्धा फायरिंग केली. नेपाळ पोलिसांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ कर्फ्यू लावला आहे. जेणेकरुन प्रदर्शनकारी निवासस्थानी घुसू नये.
प्रदर्शनकारी बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीसाठी सरकारला जबाबदार ठरवत आहेत. विराटनगर, भरतपुर आणि पोखरा येथे प्रदर्शन झालं. पंतप्रधान केपी ओली सरकारने 4 सप्टेंबरला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, वॉट्सऐप, रेडिट आणि X सारख्या 26 सोशल मीडिया ऐप्सवर बंदी घातली आहे. युवकांच म्हणणं आहे की, बंदीमुळे शिक्षण आणि व्यवसाय प्रभावित होत आहे.
VPN मधून बॅन तोडण्याचा प्रयत्न
जे लोक फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून सामान विकायचे, त्यांचा बिझनेस थांबला आहे. YouTube आणि GitHub सारखे प्लेटफॉर्म चालत नसल्याने मुलांच शिक्षण अडचणीत आलं आहे. परदेशात राहणाऱ्या लोकांशी बोलणं महाग आणि कठीण बनलय. लोकांमध्ये इतकी नाराजी आहे की, बऱ्याच लोकांनी VPN मधून बॅन तोडण्याचा प्रयत्न केला.
अशी नेपाळमध्ये स्थिती
सरकारने टिकटॉकवर बॅन लावलेला नाही. त्यावेळी लोकांनी या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकून आंदोलन सुरु केलय. नेत्यांची मुलं ऐशोरामात आणि सर्वसामान्य बेरोजगार अशी नेपाळमध्ये स्थिती आहे. भरपूर व्हिडिओमध्ये #RestoreOurInternet हॅशटॅग व्हायरल झालाय.
Gen-Z स्कूल यूनिफॉर्म घालून सहभागी
प्रदर्शनात Gen-Z स्कूल यूनिफॉर्म घालून सहभागी झाले. 28 वर्षावरच्या मुलांना प्रदर्शनात येऊ दिलं नाही. त्यांनी सोशल मीडिया चालू करणं, भ्रष्टाचार बंद करणं, नोकरी आणि इंटरनेट एक्सेसची डिमांड ठेवली.
सेक्शन 6 अंतर्गत कर्फ्यू
आंदोलक नियंत्रणाबाहेर जाऊन संसद परिसरात पोहोचले, त्यावेळी काठमांडू डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ऑफिसने संपूर्ण न्यू बानेश्वरमध्ये कर्फ्यू लावला. मुख्य जिल्हाधिकारी छाबीलाल रिजाल यांनी सेक्शनमध्ये 6 अंतर्गत दुपारी 12. 30 पासून कर्फ्यू लावला आहे. रात्री 10 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असेल.