AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार, सुप्रिया सुळे यांना सोडून सुनेत्रा पवार यांनी थेट बारामतीत घेतली या व्यक्तीची भेट, उपमुख्यमंत्री होताच…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि पवार कुटुंबातील वाद पुढे आला.

शरद पवार, सुप्रिया सुळे यांना सोडून सुनेत्रा पवार यांनी थेट बारामतीत घेतली या व्यक्तीची भेट, उपमुख्यमंत्री होताच...
Sunetra Pawar
| Updated on: Feb 02, 2026 | 10:32 AM
Share

मुंबईहून बारामतीला अजित पवार निघाले असता बारामती विमानतळाच्या शेजारी त्यांच्या विमानाची मोठा अपघात झाला. सुरूवाला सांगितले गेले की, अजित पवार या अपघातात गंभीर जखमी झाले. मात्र, त्यानंतर थेट अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी आली. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांचे विमान कोसळण्यापूर्वीचे काही व्हिडीओ आली, ज्यामध्ये त्यांचे विमान एका बाजूला पूर्णपणे झुकल्याचे स्पष्ट दिसले. अजित पवार यांच्या निधनावेळी संपूर्ण पवार कुटुंबिय एक दिसले. मात्र, काही तासातच पवार कुटुंबातील वाद पुढे आला. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे शरद पवारांसह सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. शरद पवार हे बारामतीत असतानाच सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता शपथ घेण्याचा निर्णय घेतला.

माध्यमांसमोर येऊन याबद्दल माहिती देताना शरद पवार दिसले. ज्यानंतर आजोबांच्या भेटीला थेट पार्थ पवार पोहोचला. पार्थ भेटल्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, मला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल काहीच कल्पना नाही. तो त्याच्या आजोबा आज्जीला भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे या थेट दिल्लीकडे रवाना झाल्या. देशाचे बजेट असल्याने मला दिल्लीत जावे लागेल असेही त्यांनी म्हटले.

दुसऱ्यादिवशी शरद पवार मुंबईत आले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्या पहिल्यांदाच बारामतीमध्ये दाखल झाल्या. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही बारामतीत नव्हते. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीमध्ये खास व्यक्तीचे भेट घेतली. सुनेत्रा पवार या सासू आशाताई यांच्या भेटीला पोहोचल्या. सुनेत्रा पवार यांनी सासू आशाताई यांच्यासोबत चर्चा करून आर्शिवाद घेतल्याचे कळतंय.

यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत मुलगा पार्थ पवार हा देखील उपस्थित होता. सुनेत्रा पवार सायंकाळी काटेवाडीत गेल्या होता. आज त्या सातारा दाैऱ्यावर आहेत, त्यानंतर त्या परत बारामतीकडे जाणार असल्याची माहिती मिळतंय. दोन्ही पक्षांचे विलिगीकरण होणार की नाही? याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?