डोनाल्ड ट्रम्प यांचा थरकाप, अमेरिकेत भीतीचे वातावरण, उडाली मोठी खळबळ, थेट…

टॅरिफच्या वादातून भारत आणि अमेरिकेमध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळतंय. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी दबाव टाकला जातोय. शिवाय आता पुतिन यांनी अमेरिकेला एक अत्यंत मोठा झटका दिल्याचे बघायला मिळतंय. ज्यानंतर त्यांच्य तणावात मोठी वाढ झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा थरकाप, अमेरिकेत भीतीचे वातावरण, उडाली मोठी खळबळ, थेट...
vladimir putin and donald trump
| Updated on: Aug 24, 2025 | 4:08 PM

अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला असून भारतावर टॅरिफसाठी दबाव टाकला जातोय. अमेरिकेकडून अगदी खालच्या पातळीवर जाऊन भारतावर टीका केली जात आहे. काही देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेची निंदा करत या टॅरिफचा निषेध केलाय. हेच नाही तर भारतीयांचा अमेरिकेवरील विश्वास उडाला आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध भारतामुळे सुरू असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेकडून करण्यात आला. हेच नाही तर टॅरिफचा महाराजा, रशियाचे कपडे धुण्याचे मशीन असे बरेच चुकीचे शब्द अमेरिकेकडून भारतासाठी वापरण्यात आली. भारतानेही अमेरिकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

भारतावर टॅरिफ लावल्यापासून अमेरिकेला एका मागून एक जोरदार झटके मिळत आहेत. अनेक देश थेट अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरली आहेत. जगाचा रोष अमेरिकेवर असतानाच आता उत्तर कोरियानेही अमेरिकेच्या टेन्शनमध्ये भर पाडलीये. कोरियन हुकूमशहा किम जोंग उन यांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (ICBM), हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्र पाणबुड्या वाढवून अमेरिकेच्या तणावात वाढ केलीये. त्यामध्ये आता अजून एक मोठा धक्का देण्यात आलाय. पुतिन यांच्यावर अमेकिकेकडून दबाव टाकण्याचे काम सुरू असतानाच पुतिन यांना त्यांचा जवळचा मित्र किम जोंग उन  याला हाताला धरून मोठा गेम अमेरिकेचा केला आहे.

कोरियाने त्यांचे स्वत:चे  S-400 हवाई संरक्षण विकसित केले आहे. ही माहिती कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (KCNA) ने दिली आहे. यामुळे अमेरिकेच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. उत्तर कोरियाने आपल्या दोन नवीन हवाई संरक्षण प्रणालींची चाचणी केलीये. याचा एक खळबळ उडवणारा फोटोही पुढे आल्याचे बघायला मिळतंय. ज्यावेळी या क्षेपणास्त्राची चाचणी ही केली जात होती, त्यावेळी हुकूमशहा किम जोंग उन हा देखील तिथे उपस्थित असल्याचे बघायला मिळाले.

हुकूमशहा किम जोंग उन हा क्षेपणास्त्र चाचणीचे निरीक्षण करताना फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतोय. 19 ऑगस्ट रोजी दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. दोन्ही देशांमध्ये मोठे तणावाचे वातावरण असताना आता किम जोंग उन याने थेट क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने खळबळ उडाली आहे. नवीन हवाई संरक्षण प्रणालीसह अमेरिकेचा ताण वाढवलयाचे बघायला मिळत आहे. भारतावर 27 ऑगस्टपासून 50 टक्के टॅरिफ हा लागू केला जाणार आहे.