जग हादरलं! पुतिन यांनी बटन दाबायला थांबवल्याने टळले जगावरील मोठे संकट, खळबळजनक दावा
अमेरिका सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, यादरम्यान भारतावर थेट गंभीर आरोप ही सातत्याने केली जात आहेत. आता यादरम्यानच अत्यंत मोठा खुलासा झाल्याचे बघायला मिळत आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला भारतच कारणीभूत असल्याचे अमेरिकेने म्हटल्याने खळबळ उडाली. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो आणि तो पैसा रशिया युद्धासाठी वापरतो, असे अमेरिकेने म्हटले. आता रशिया आणि युक्रेनच्या युद्धाबाबत अत्यंत मोठा आणि धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्जेंडर लुकाशेंको यांनी हा खुलासा केला आणि संपूर्ण जग हादरलंय.
अलेक्जेंडर लुकाशेंको यांनी म्हटले की, काही रशियन अधिकाऱ्यांनी थेट युक्रेनची राजधानी कीवमधील राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेंस्की यांच्या कार्यालयावर नवीन आणि अत्यंत घातक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचे ठरवले होते. सर्वकाही ठरले होते. हे ओरेशनिक क्षेपणास्त्र इतके जास्त भयंकर आहे की, बोलण्याच्या वेगापेक्षा कितीतरी पट अधिक त्याचा वेग आहे. काही सेकंदामध्ये ते सर्वकाही उद्धवस्थ करू शकते. हेच घातक क्षेपणास्त्र त्यांनी वोलोदिमिर जेलेंस्की यांच्या कार्यालयावर टाकण्याचा निर्णय घेतला होता.
फक्त क्षेपणास्त्राचे बटन दाबणे शिल्लक होते, बाकी सर्व नियोजन झाले होते. मात्र, व्लादिमीर पुतिन यांनी अधिकाऱ्यांना असे करण्यापासून रोखले. पुतिन यांनी भयानक क्षेपणास्त्र हे वोलोदिमिर जेलेंस्की यांच्या कार्यालयावर टाकण्यास मनाई केल्याने अधिकारी थांबले नाही तर त्यावेळीच सर्वकाही संपले असते. रशियातील काही लोकांनी कीवच्या वोलोदिमिर जेलेंस्की कार्यालयावर क्षेपणास्त्र टाकण्याचा सल्ला दिला होता मात्र, पुतिन यांनी तसे केले नाही. पुतिन यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट म्हटले होते की, असे अजिबात करायचे नाही. जर त्यावेळी पुतिन यांनी यासाठी नकार दिला नसता तर शिल्लक काहीच राहिले नसते.
एका रिपोर्टनुसार, ज्यावेळी रशियाच्या अधिकाऱ्यांनी वोलोदिमिर जेलेंस्की यांच्या कार्यालयावर हे क्षेपणास्त्र टाकायचे ठरवले होते, त्यावेळी जेलेंस्की हे त्यांच्या कार्यालयातच उपस्थित होते आणि तशी गुप्त माहिती ही रशियाच्या अधिकाऱ्यांकडे होती. पुतिन हे सध्याच्या परिस्थितीला जेलेंस्की यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहेत. मात्र, आता युक्रेनकडून नेमका काय प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. हेच नाही तर अमेरिकेच्या दाैऱ्यानंतर रशियाकडून युक्रेनवर हल्ला चढवण्यात आला आहे.
