अमेरिकेनं इराणला अक्षरश: हादरवलं, 2000 पाऊंड्सचा बॉम्ब टाकला, आगीच्या उंचच उंच ज्वाळा, कंपनं अन्..

Iran US War Update : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांची विश्वासघातकी युद्धनिती दाखवून दिली आहे. एकाबाजूला ते युद्धा लवकर संपणार, इराणबरोबर सकारात्मक चर्चा सुरु असल्याचं सांगत आहेत. पण दुसरीकडे त्यांनी इराणला अक्षरश: हादरवून सोडलय. त्यांनी इराणवर एक मोठा हल्ला केलाय.

अमेरिकेनं इराणला अक्षरश: हादरवलं, 2000 पाऊंड्सचा बॉम्ब टाकला, आगीच्या उंचच उंच ज्वाळा, कंपनं अन्..
Donald Trump
| Updated on: Mar 31, 2026 | 10:17 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराण बरोबर सकारात्मक चर्चा सुरु असल्याचं एकीकडे सांगत आहेत, पण दुसऱ्याबाजूला अमेरिकन सैन्याने इराणवरील हल्ले देखील अजून तीव्र केले आहेत. अमेरिकेची जवळपास 50 हजाराची फौज आणि अत्याधुनिक युद्धनौका या इराण जवळच्या समुद्रात पोहोचल्या आहेत. अमेरिका आता जमिनी युद्धाचा टप्पा सुरु करणार असल्याचा अनेक रणनितीकारांचा अंदाज आहे. मध्य पूर्वेतील या युद्धाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालाय. पण अजूनही इराणने हार मानलेली नाही. उलट इराणकडून अमेरिका आणि इस्रायलच्या तळांवर जशास तसे हल्ले सुरु आहेत. त्यामुळे या इराणच काय करायचं? हा डोनाल्ड ट्रम्प यांना पडलेला प्रश्न आहे.

कारण आता युद्ध अर्ध्यावर सोडणं जास्त घातक आहे. एक म्हणजे यामुळे जगभरात अमेरिकेची नाचक्की होईल. दुसरीकडे आखातामध्ये इराणचं वर्चस्व वाढेल. भविष्यात ते सौदी अरेबिया, कतर, संयुक्त अरब अमिरात, बहरीन, ओमान या देशांसमोर आव्हान निर्माण करतील. त्याशिवाय अमेरिका आखाती देशांचं रक्षण करण्यास असमर्थ आहे हे सुद्धा कळून येईल. त्यामुळे आता युद्ध अर्ध्यावर सोडलं तर अमेरिकेच्या सुपर पॉवरच्या इमेजला मोठा तडा जाईल.

स्फोटांची एक संपूर्ण मालिकाच

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये झालेल्या एका मोठ्या स्फोटाचा व्हिडिओ शेअर केलाय. मिडिया रिपोर्ट्सनुसार हा स्फोट मंगळवारी इस्फहान शहरात झाला. व्हिडिओ फुटेजमध्ये स्फोटांची एक संपूर्ण मालिकाच दिसते. या स्फोटानंतर भीषण आग भडकली. त्याने आकाश नारंगी रंगात रंगून गेलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्हिडिओ बद्दल काही संदर्भ दिलेला नाही. पण मीडियी रिपोर्ट्समध्ये इस्फहानमधील एका मोठ्या दारुगोळ्याच्या कोठारावर अमेरिका-इस्रायलने संयुक्त हल्ला केला, त्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय. इस्फहान हे 23 लाख लोकसंख्येचं इराणी शहर आहे. इथे इराणी बंदर आणि मिलिट्री बेस आहे.

आगीच्या उंच-उंच ज्वाळा

अमेरिकी सैन्याने इस्फहानमधील दारु गोळ्याच्या कोठारावर 2,000 पाऊंड (जवळपास 907 किलोग्राम) बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला. या हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात बंकर बस्टर पेनेट्रेटर दारु गोळ्याचा वापर करण्यात आला. वॉल स्ट्रीट जर्नलने एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. या हल्ल्यामुळे अनेक जोरदार स्फोटांची मालिका सुरु झाली. त्यामुळे संपूर्ण भागात आगीच्या उंच-उंच ज्वाळा आणि शॉकवेव्स पसरल्या असा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय.

इस्फहानवरच हल्ला का?

इराणने जवळपास 540 किलोग्रॅम अत्याधुनिक समृद्ध युरेनियम इस्फहान येथील एका भूमिगत सुविधा केंद्रात स्थानांतरीत केलेलं असू शकतं असं एक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जून महिन्यात ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ दरम्यान अमेरिकेने याच इस्फहान शहराला टार्गेट करुन बंकर बस्टर बॉम्ब टाकले होते. इराणची अणवस्त्र विकसित करण्याची क्षमता नष्ट करणं हा इस्फहान वरील हल्ल्यामागे मुख्य उद्देश आहे.

Follow Us