AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात घडलं भयंकर! जगाची उडाली झोप, इराणकडून थेट दुबईच्या…

इराण आणि अमेरिका युद्धाचा झळा सर्वांनाच बसत आहेत. त्यामध्येच मोठे हल्ले केले जात आहेत. युद्ध थांबवण्याकरिता काही अटी इराणकडून ठेवण्यात आल्या. मात्र, अमेरिका एका मागून एक मोठ्या धमक्या इराणला देताना दिसत आहेत. त्यामध्येच इराणकडून धक्कादायक पाऊल उचलण्यात आले.

समुद्रात घडलं भयंकर! जगाची उडाली झोप, इराणकडून थेट दुबईच्या...
Iran Attack
| Updated on: Mar 31, 2026 | 9:42 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाला सुरूवात होऊन आता एक महिना झाला. पण युद्ध काही थांबत नाही. यादरम्यानच अमेरिकेकडून मोठी धमकी देण्यात आली. इराणने युद्धबंदीचा करार मान्य केला नाही तर त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करू असे सांगण्यात आले. इराणकडून युद्ध थांबवण्याकरिता 6 अटी ठेवण्यात आल्या. इराणने स्पष्ट शब्दात म्हटले की, आमच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले झाले तर आम्ही प्रदेशात असलेल्या अमेरिकेन संबंधित सर्व ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करू. इराण आणि अमेरिका युद्ध एका वेगळ्या स्थितीत पोहोचले आहे. काही देशांमध्ये लॉकडाऊन लागण्याची स्थिती आहे. कच्चे तेल आणि एलपीजी गॅसची आयात आणि निर्यात थांबली. या युद्धात तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले करण्यात आली. अमेरिकेने इराणला घेरण्याचा प्रयत्न केला असून 21 युद्धनाैक्यांनी घेरले. पण इराण हार मानत नाहीये. इराण आणि अमेरिका यांच्यातील स्थिती भयंकर आहे.

गेल्या 24 तासात इराणवर 100 पेक्षा अधिक घातक हल्ले करण्यात आली. दुबई, साैदी अरेबिया, कतार, कुवेत या सारख्या देशांना या युद्धाचा मोठा फटका बसला. इराण बेधडकपणे हल्ले करत आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचलेल्या असताना आता मोठं संकट निर्माण झाले.

दुबईतील तेलवाहू जहाजावर इराणकडून मोठा हल्ला करण्यात आला. कित्येक लीटर तेल या हल्ल्यानंतर समुद्रात वाहून गेले. हा हल्ला अत्यंत भीषण होता. मोठी खळबळ उडाली. इराणकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. यापूर्वी इराणकडून अशाच प्रकारचा मोठा हल्ला दुबईत असलेल्या तेल रिफायनरीवर करण्यात आला.

आता दुबईतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती सतत वाढत असतानाच हा हल्ला झाला. इराणने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट म्हटले की, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती स्थिर किंवा अस्थिर फक्त इराण ठेऊ शकतो. अमेरिकेकडे कोणतेही अधिकार नाहीत. इराण आणि अमेरिका युद्धामुळे एक वेगळे संकट जगापुढे आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा