AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय असल्यामुळेच वाचलो… शेवटी कलमा वाचत होतो पण एक हिंदुस्थानी असल्याने.. व्लॉगरने सांगितली 12 दिवसांची…

अमेरिका आणि इराण युद्धात स्थिती भयंकर आहे. हजारो लोकांच्या जीवन धोक्यात आहेत. हजाराच्या घरात या युद्धात लोकांचे जीव गेले. इराणमधील परिस्थिती अत्यंत बिकड आहे. एक भारतीय असल्याने आपण इराणमध्ये कसे वाचलो हे सांगताना एक भारतीय व्लॉगर दिसला आहे.

भारतीय असल्यामुळेच वाचलो... शेवटी कलमा वाचत होतो पण एक हिंदुस्थानी असल्याने.. व्लॉगरने सांगितली 12 दिवसांची...
Umar Iqbal
| Updated on: Mar 31, 2026 | 8:37 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाला 1 महिना पूर्ण झाला. या काळात मोठे नुकसान झाले. अनेक लोक या युद्धात ठार झाले. युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. इराणवर मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. मात्र, तरीही इराण हार मानत नाही. इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आल्याने जगाची झोप उडाली. इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना पूर्ण झाला. तेथील परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. इराणमध्ये असलेले भारतीय लोक सुरक्षित आहेत. जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी असलेल्या उमर इक्बाल याने युद्धाच्या काळात इराणमध्ये 12 दिवस घालवले, तो एक व्लॉगर आहे. त्याने अफगाणिस्तानपासून इराणपर्यंतचा प्रदेश फिरला. यावेळी त्याने न्यूज 18 सोबत बोलताना यादरम्यानचे आपले सर्व अनुभव सांगितले. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की, मी भारतीय असल्याने येथे जिवंत आहे.

उमर इक्बाल याने म्हटले की, काही वेळ अशी आली की, मला वाटले की, माझ्या आयुष्याचा शेवटचा क्षण आला. मी कोणत्याही क्षणी ठार होणार असल्याचे कळाल्यावर मी शेवटचा कलमा वाचत होतो. आजूबाजुला मिसाईल पडत होते. मी एक भारतीय व्यक्ती असल्याने मला इराणच्या सुरक्षारक्षकांनी आणि नागरिकांनी मोठी मदत केली. लवकरात लवकर येथील परिस्थिती नियंत्रणात यावी, अशी अपेक्षा करतो.

इक्बाल हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात इराणमध्ये पोहोचला होता. तो व्लॉगर असून तो आपल्या व्लॉगिंग करिता इराणमध्ये गेला होता. त्यानंतर युद्धाला सुरूवात झाली. 12 दिवसांच्या व्हिसावर आपण इराणमध्ये आलो होतो. त्यानंतर इराणच्या दूतावासाने व्हिसा देण्यास नकार दिली. त्यानंतर अनेक प्रयत्नानंतर मला 12 दिवसानंतरचा व्हिसा मिळाला. यासोबतच लवकरात लवकर देश सोडण्याचा इशाराही दिला.

2 मार्चला मोठा हल्ला झाला. मी तिथेच होतो, त्यानंतर मी बचावकार्यात सहभागी झालो आणि मीही थोडा जखमी झालो. त्याने पुढे बोलताना म्हटले की, 6 मार्च रोजी त्याने तैबादच्या दिशेने सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास केला. वाटेत भीती आणि अनिश्चितता कायम होती. 7 मार्च रोजी अफगाण सीमा ओलांडून हेरातला पोहोचल्यावर त्यांना आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला. पण एक भारतीय असल्यानेच आपण जिवंत असल्याचे वारंवार सांगताना इक्बाल दिसला.

Follow Us
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय