AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीक दिल्याप्रमाणे… हेमा मालिनी यांनी मांडलं बॉलिवूडचं नागडं सत्य; धक्कादायक विधानाने खळबळ

हेमा मालिनींनी 70 च्या दशकातील मानधनाविषयीच्या अफवांचे खंडन केले आहे. त्या काळात त्यांना जास्त पैसे मिळत नव्हते, उलट लिफाफ्यात 'भीक दिल्याप्रमाणे' मानधन दिले जायचे, असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला. आजच्या अभिनेत्रींच्या तुलनेत ते खूपच कमी होते.

भीक दिल्याप्रमाणे... हेमा मालिनी यांनी मांडलं बॉलिवूडचं नागडं सत्य; धक्कादायक विधानाने खळबळ
Hema MaliniImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 09, 2026 | 12:00 AM
Share

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी त्यांच्याविषयी पसरलेल्या अफवेवर खुलासा केला आहे. 70च्या दशकात हेमा मालिनी या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. त्यावेळी त्या एका सिनेमासाठी बरेच पैसे घ्यायच्या. बॉलिवूडमधील हायेस्ट पेड अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना व्हायची, अशी चर्चा सुरू आहे. यावर हेमा मालिनी यांनी खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, असं काही नव्हतं. उलट आम्हाला भीक दिल्यासारखं लिफाफ्यातून पैसे दिले जायचे.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या विषयी उडालेल्या अफवांचं खंडन करतानाच बॉलिवूडचं नागडं सत्यही समोर आणलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी अफवांचं खंडन केलं. मला सर्वाधिक पैसा मिळायचा? नाही नाही…असं काहीच नव्हतं. तुम्हाला या गोष्टी कुणी सांगितल्या? तेव्हा मला खूप कमी पैसे मिळत होते. मला कधीच ज्यादा फिस दिली गेली नाही. अर्थात त्या काळातील अनेक फिल्ममेकर्स मला प्राधान्याने सिनेमात घ्यायचे. पण मीही कधी पैशासाठी काम केलं नाही, असं हेमा मालिनी म्हणाल्या.

तुम्ही जितकं प्रसिद्ध होता, तेवढी तुमची प्राईज त्या हिशोबाने वाढते. मला कधीच एवढी मोठी रक्कम मिळाली नाही. उलट आजच्या अभिनेत्रींना मोठी रक्कम मिळते. मला तर आजच्या अभिनेत्रींच्या तुलनेत मानधनाचा छोटासा भागही मिळाला नाही. पण त्यावेळी कमी पैशातही आम्ही जे काम केलं, तीच आमची असली कमाई होती. पैशापेक्षा आम्हाला काम महत्त्वाचं होतं, असं हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलं.

पैशासाठी सिनेमा सोडला नाही

मी नेहमीच माझा नवरा आणि बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांच्या नियमांचं पालन केलं. मी कधीच माझ्या इच्छेनुसार माझी फी वाढवत नाही. निर्माते जेवढे पैसे देऊ शकतात, तेवढेच मी घेते. जर निर्माते समोरून ज्यादा पैसे देत असतील तर त्याचं स्वागतच असायचं. पण आम्ही कधीच पैशासाठी सिनेमात काम न करण्याची धमकी दिली नाही. मी कधीच असं केलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आईबद्दल काय सांगितलं?

यावेळी हेमा मालिनी यांनी त्यांची आई जया चक्रवर्ती यांच्याबाबतही भाष्य केलं. सुरुवातीच्या काळात त्यांची आईच त्यांची मॅनेजर होती. माझी आई सर्व निर्मात्यांसोबत उदार होती. जर शुटिंगसाठी पैसे नाहीत, असं एखाद्या निर्मात्याने म्हटलं तर माझी आई म्हणायची काही हरकत नाही. मी 1979 मध्ये मीरा सिनेमा केला होता. त्यावेळी निर्मात्याकडे काहीच पैसे नव्हते. त्यावेळी आम्ही कधीच पैशाची मागणी केली नाही. निर्माता लिफाफ्यात जेवढे पैसे ठेवायचा तेवढे आम्ही घ्यायचो. जणू काही भीकच मिळालीय असं, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा