AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेचा ‘सुहागरात कोच’वादात सापडला, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई..

भारतीय रेल्वेच्या एका एक्सप्रेसच्या 1AC कोचला सुहागरातच्या प्रमाणे डेकोरेशन केल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.या व्हिडीओ प्रमाणे रेल्वे सेवा पुरवते काय ? यावरुन एकच चर्चा सुरु झाली आहे.

रेल्वेचा 'सुहागरात कोच'वादात सापडला, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई..
SUHAGRAT COACH
| Updated on: Jul 09, 2026 | 12:11 AM
Share

भारतीय रेल्वेच्या 1AC कोचला सुहागरात ( मधूचंद्राची रात्र ) प्रमाणे डेकोरेशन केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भात रेल्वेची कोणती अशी योजना आहे ज्यात ट्रेनमध्ये हनिमून साजरा करता येतो याची उत्सुकता प्रवाशांना लागली होती. त्यानंतर या प्रकरणात रेल्वेकडून आता मोठी कारवाई करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनच्या 1AC कोचला मधूचंद्राच्या रात्री प्रमाणे डेकोरेशन केल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणात रेल्वेने आता कारवाई केली आहे. या प्रकरणात एका खाजगी सजावटकाराला परवानगीशिवाय रेल्वेच्या कोचमध्ये प्रवेश देऊन त्यास सजवू  दिल्याप्रकरणात आता रेल्वेने तिकीट तपासनीसाला निलंबित केले आहे. रेल्वे प्रशासनाने ही एक गंभीर सुरक्षा त्रुटी मानली असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनच्या १ एसी डब्याच्या सजावटीचे प्रकरण व्हायरल होत आहे. हनीमून रूमप्रमाणे सजवलेल्या डब्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने आता संबंधित टीसीला ( तिकीट तपासनीस) निलंबित केले आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

हा व्हिडीओ ६ जुलै २०२६ च्या ट्रेन क्रमांक ११००२ नंदीग्राम एक्सप्रेसचा आहे. या ट्रेनचा प्रवास करणाऱ्या एका कपलने त्यांच्या प्रवासाला खास क्षणांना साजरा करण्यासाठी हनीमून डेकोरेशन केले आहे. त्यांनी या आपल्या आरक्षित 1AC कोचच्या केबिनला सुहागरातचे डेकोरेशन करण्यासाठी ऑनलाईन एका खाजगी डेकोरेशन करणाऱ्याला हायर केले होते. या डेकोरेटरने ट्रेनच्या आत शिरुन संपूर्ण केबिनला सुहागरातच्या केबिन प्रमाणे सजवले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासना तातडीने पावले उचलली आहे.

ट्रेस पासिंगची केस होऊ शकते ?

या प्रकरणात ट्रेनच्या संबंधित स्टाफला तत्काळ निलंबित केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रेल्वेने दिले आहेत. जर एखादा प्रवासी संपूर्ण केबिन बुक करत असेल तर आणि त्याला आपल्या मनाप्रमाणे सजवत असेल तर रेल्वेला यावर कोणताही आक्षेप नाही. हा प्रवाशांचा अधिकार आहे कसा प्रवास करायचा आहे. मात्र, डब्यात एका त्रयस्त व्यक्तीला बेकायदेशीर अनधिकृतपणे प्रवेश देऊन अशा प्रकारे रेल्वेला धोक्यात खालले चुकीचे असल्याने या प्रकरणात टीटीईवर निलंबनाची कारवाई झाली आहे..

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?