Nvidia CEO Affair : ती चिनी महिला हेर कोण? जिने अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी Nvidia च्या CEO ना अडकवलं जाळ्यात

Nvidia CEO Affair : दिग्गज टेक कंपनी एनवीडियाच्या सीईओच्या अफेअरमुळे अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे. आपण बायकोला फसवलं हे सुद्धा एनवीडियाच्या सीईओच्या मान्य केलय. महत्वाचं म्हणजे या सगळ्यात चिनी हेरगिरीचा अँगल आहे.

Nvidia CEO Affair : ती चिनी महिला हेर कोण? जिने अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी Nvidia च्या CEO ना अडकवलं जाळ्यात
Nvidia CEO Affair
Image Credit source: X/@wangjupaian
| Updated on: Nov 09, 2026 | 1:25 PM

एनवीडियाचे सीईओ जेनसन हुआंग यांनी चिनी महिला हेरासोबत अफेअरची कबुली दिली आहे. आपल्या कृती बद्दल जेनसन हुआंग यांनी खंत व्यक्त केली आहे. हुआंग यांनी पत्नी आण मुलांची माफी मागितली आहे. एनवीडिया ही चीप मेकिंगमधली दिग्गज कंपनी आहे. कंपनीने सुद्धा या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. 63 वर्षांचे जेनसन हुआंग यांनी कर्मचाऱ्यांना संदेश पाठवला आहे. “मी जे केलं, त्यासाठी कुठलही कारण देणार नाही. मला खेद आहे. माझ्या या पावलामुळे पत्नी आणि मुलांना त्रास झाला. मी कंपनीचे कर्मचारी, संचालक मंडळ आणि शेअर धारकांप्रती असलेली जबाबदारी निभावण्यात कमी पडलो” हे सुद्धा जेनसन हुआंग यांनी कबूल केलं. “कर्मचाऱ्यांची सेवा करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं ही जबाबदारी असल्याचं हुआंग यांनी सांगितलं. ही जबाबदारी निभावण्यात मी कमी पडलो. एनवीडियासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. कामाची सर्व जबाबदारी स्वीकारुन पुन्हा विश्वास संपादन करु” असं हुआंग यांनी म्हटलं आहे.

जेनसन हुआंग यांच्या अफेअरमुळे एनवीडियाने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित काही तडजोड केली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. ती महिला चिनी हेर असल्याचं बोलल जातय. त्यामुळे कंपनीने स्वतंत्र चौकशी सुरु केली आहे. कंपनीच्या स्वतंत्र समितीच्या संचालकांचं या चौकशीवर लक्ष असेल. बाहेरुन कायदेशीर मदत ही घेतली जाईल. हुआंग यांनी या चौकशीला पूर्ण सहकार्य करु असं म्हटलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि कंपनीच्या गोपनीय डेटाशी तडजोड झाल्याचा कुठलाही पुरावा नाहीय असं एनवीडियाच्या संचालक मंडळाने म्हटलं आहे. चौकशीत सर्व माहिती तपासली जाईल. अमेरिकेच्या राष्ट्रीय आणि आर्थिक सुरक्षेची संरक्षण करणं पहिली प्राथमिकता असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

Loading...

नेमकी चीनला कुठली टेक्नोलॉजी मिळालीय?

न्यू यॉर्क टाइम्स मध्ये मागच्या महिन्यात एक रिपोर्ट प्रकाशित झालेला. त्यात चिनी महिला उद्योजक एलिस हुआंग यांच्यासोबत जेनसन हुआंग यांचे निकटचे संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. रिपोर्टनुसार एलिस हुआंग या चीनच्या गुप्तचर एजंट म्हणून काम करत होत्या. एलिस हुआंग यांचा जेनसन हुआंग यांच्याशी कोणताही कौटुंबिक संबंध नाहीय. त्या आधी सिंगापूरची डेटा सेंटर कंपनी मेगा स्पीडशी संबंधित होत्या. अमेरिकी अधिकाऱ्यांनी या कंपनीची सुद्धा चौकशी केली. या अफेअरमुळे अत्याधुनिक AI चीप्स मिळवण्यासाठी चीनला मदत झाल्याचा अमेरिकन अधिकाऱ्यांना संशय होता. कारण अमेरिकेने या चीप्सच्या निर्यातीवर प्रतिबंध घातले आहेत. मेगास्पीड एनवीडियाकडून AI चीप्स विकत घेते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us