AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात आहे का? बड्या नेत्याने केली थेट चौकशीची मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ

अजितदादांच्या अपघातावरून रामदास कदम यांनी संशय व्यक्त केला. दादांच्या अपघात प्रकरणात सुनील तटकरे यांची चौकशी करावी, अशी माागणी रामदास कदम यांनी केली.

अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात आहे का? बड्या नेत्याने केली थेट चौकशीची मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ
| Updated on: Nov 09, 2026 | 1:24 PM
Share

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी : अजितदादांच्या अपघाताला 10 महिने उलटल्यानंतरही काही नेत्यांकडून घातापाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. रोहित पवार यांनीही अजितदादांच्या अपघाताची चौकशीची मागणी केली होती. अजितदादांच्या अपघात प्रकरणात रोहित पवार हे पत्रकार परिषद घेऊन आणखी एक खुलासा करणार आहे. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेआधीच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात आहे का? असा सवाल करत रामदास कदम यांनी चौकशीची मागणी केली आहे.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबो केला. रामदास कदम म्हणाले, ‘ लोक मला बोलत होते की, तटकरे बेईमान माणूस आहे. हा कोणाचा होणार नाही. नेमकं तसं झालं. त्याची वेळ निघून गेली. विधानसभेच्या निवडणुकीत योगेश कदम यांच्याविरोधात यांनी काम केलं. वैशिष्ट असे आहे की, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशी युती असताना गुहागरमध्ये भास्कर जाधव यांना मदत केली. त्यांनी थेट ठाकरे गटाला मदत केली. तटकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. तू ज्या मेव्हण्याला सांगतो. त्याची माझ्या बाजूला बसायची लायकी नाही’.

‘पोयनार  धरणाच्या भूमीपूजनाला…पोयनार धरण म्हणजे तुमची सासरवाडी…अजित पवार आणि तुमच्यावर कोकणातील 16 धरणांचे आरोप होते.  70 हजार कोटींचे…त्यातील हे पोयनार धरण होते. गेल्या 25 वर्षांत हे काम बंद पडलं होतं. तटकरेंचं काम होतं  की, माझ्या 14 गावातील लोक पाण्यापासून वंचित राहत आहे. ते तुझे पाप होते. त्यादिवशी बोललो नाही. शेवटी औकात दाखवली. अजितदादांनी भाजपला पाठिंबा दिला, त्यावेळी आरोप मागे घेण्यात आले. ही जनता आहे. सर्व जाणून आहे. मला बोलायला लावू नका. माझं भाषण संपताना येतो. त्यानंतर थेट माझ्याच खुर्चीवर बसतो. माजी जिल्हापरिषद खाली बसले होते. प्रोटोकॉल वगैरे आहे का नाही. तो स्वत:ला तटकरे समजतोय का…राष्ट्रवादीचा अध्यक्ष समजतो का…आला निवडून..जिंकला. ही दादागिरी कशाला…त्याची औकात मी दाखवली. तटकरे..तुम्ही जास्त मस्ती दाखवली, तर तुम्हालाही सोडणार नाही.  औकातीत राहावे, असे कदम म्हणाले. तर अजितदादांच्या अपघात प्रकरणावर त्यांनी मोठं भाष्य केलं.  अजितदादांच्या घातपातामध्ये तटकरे यांचा हात आहे का? असा सवाल करत रामदास कदम यांनी चौकशीची मागणी केली.

Follow Us
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
Manoj Jarange Patil : पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..
Raj Thackeray Speech : महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत परखड भाष्य; नेमकं काय म्हणाले?
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
गोकुळच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी..
Gokul Protest : गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी अन् पारंपरिक साहित्य घेऊन रस्त्यावर
गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! अनेक वकील....
Gokul : गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! कोल्हापुरातील अनेक वकील थेट रस्त्यावर; सरकारी हस्तक्षेपाविरोधात एकजुटीने सहभाग
गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी....
Gokul Protest : गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी पायताण, यमराजाची वेशभूषा अन्..., सतेज पाटलांच्या मोर्चाची राज्यभर चर्चा
रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा...
Gokul : रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा
राज्याच्या राजकारणात काय घडतंय, गंमत बघायची; राऊतांचं सूचक विधान....
Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात काय घडतंय, त्याची गंमत बघायची; संजय राऊतांचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण