AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Protest : गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी पायताण, यमराजाची वेशभूषा अन्..., सतेज पाटलांच्या मोर्चाची राज्यभर चर्चा

Gokul Protest : गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी पायताण, यमराजाची वेशभूषा अन्…, सतेज पाटलांच्या मोर्चाची राज्यभर चर्चा

| Updated on: Nov 09, 2026 | 12:06 PM
Share

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतरच्या वादामुळे कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा काढण्यात आला आहे. महायुतीने नियुक्त केलेल्या संचालकांना मतदान अधिकार देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात हा मोर्चा आहे. प्रतीकात्मक आंदोलनांसह संविधान वाचवण्यासाठी वकीलही सहभागी झाले आहेत, तर औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीतील वादानंतर कोल्हापुरात राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीने गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या निर्णयाविरोधात राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात आज दसरा चौकातून संघर्ष मोर्चा काढण्यात आला.

सतेज पाटील यांच्या आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या, मात्र अध्यक्ष निवडीच्या वेळी महायुतीच्या संचालकांनी गैरहजेरी लावली. यानंतर शासनाने चार संचालक नियुक्त केले. या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

हा मोर्चा दसरा चौकातील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला आहे. गोकुळ वाचवा, लोकशाही टिकवा अशा आशयाचे फलक, १० फुटी कोल्हापुरी पायताण, बैलगाडीत यमराजाच्या वेशभूषेतील कार्यकर्ता आणि बळीराजाची प्रतिकृती यांसारखी प्रतीकात्मक आंदोलने मोर्च्यात लक्ष वेधून घेत आहेत. कोल्हापूरचे वकीलही संविधानाच्या संरक्षणासाठी या मोर्च्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. एकीकडे कोल्हापुरात जनआक्रोश सुरू असताना दुसरीकडे औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली आहे.

Published on: Nov 09, 2026 12:06 PM

Follow Us