AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul : गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच...

Gokul : गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच…

| Updated on: Nov 09, 2026 | 11:21 AM
Share

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. सरकारने ५ स्वीकृत सदस्य नियुक्त करून त्यापैकी ४ सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने वातावरण तापले आहे. या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीने कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढला आहे.

कोल्हापूर येथील प्रसिद्ध गोकुळ दूध संघात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. राज्य सरकारने ५ स्वीकृत सदस्य नियुक्त करून त्यापैकी ४ सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. या सरकारी निर्णयामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाचा मार्ग महायुतीसाठी सुकर झाल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीने आज कोल्हापुरात संघर्ष मोर्चाचे आयोजन केले आहे. सकाळपासूनच मोर्चामध्ये सामील होण्यासाठी शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दसरा चौकात जमायला सुरुवात झाली होती. कोल्हापुरी चप्पल आणि काळे झेंडे घेऊन आलेल्या आंदोलकांनी लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

मोर्चाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सतेज पाटील यांनी यापूर्वीच रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. सरकारच्या या निर्णयाला गोकुळ अमूलच्या ताब्यात देण्याचा डाव असल्याचे सांगत पाटील यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.

Published on: Nov 09, 2026 11:21 AM

Follow Us