AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुश्श, जगाची एका युद्धातून सुटका? युक्रेनच्या राष्ट्रपतींकडून मोठा प्रस्ताव, पुतीन यांच्याकडे सर्वांच्या नजरा

Volodymyr Zelenskyy Ceasefire Proposal to Russia: युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना एक मोठा प्रस्ताव दिला आहे. यामुळे जगातील दीर्घकाळापासून सुरू असलेले युद्धा थांबण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

हुश्श, जगाची एका युद्धातून सुटका? युक्रेनच्या राष्ट्रपतींकडून मोठा प्रस्ताव, पुतीन यांच्याकडे सर्वांच्या नजरा
रशिया युक्रेन युद्धImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 05, 2026 | 10:41 AM
Share

Russia-Ukraine Conflict: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यासमोर युद्ध बंदी प्रस्ताव ठेवला आहे. अमेरिकेचे दूर हे रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. अमेरिकन अधिकार कीवच्या दौऱ्यावर येत आहे, त्यांचे झेलेन्स्की यांनी स्वागत केले आहे. याच दरम्यान शुक्रवारी रशियाने युक्रेनची राजधानी कीववर ड्रोनद्वारे हल्ला चढवला. युक्रेनमधील सुरक्षा दलाच्या SBU मुख्यालयावर ड्रोनने निशाणा साधला. त्यावर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली.

हल्ल्याला प्रत्युत्तर देणार

झेलेन्स्की यांनी सांगितले की, ड्रोन वोलोदिमिर्स्का स्ट्रीटवरील संरक्षण दलाचे मुख्यालय SBU च्या केंद्रीय इमारतीवर पडले. ही इमारत सेंट सोफिया कॅथेड्रल समोर आहे. या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यासंबंधीचे निर्देशही SBU ला देण्यात आले. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अंड्री सिबिहा यांनी रशियाची ही कुरापत दोन्ही देशांमध्ये तणाव वाढवणारी असल्याचा दावा केला. यामुळे दोन्ही देशांमध्ये होऊ पाहत असलेल्या शांतता चर्चेला धोका निर्माण होऊ शकतो, असे सुद्धा ते म्हणाले.

विटकॉफ आणि कुशनर पहिल्यांदाच कीव दौऱ्यावर

एका वरिष्ठ युक्रेन अधिकाऱ्याने माहिती दिली की, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे खास दूत स्टीव्ह विटकॉफ आणि त्यांचे जावाई जेरेड कुशनर हे पहिल्यांदाच कीवच्या दौऱ्यावर येत आहेत. ते येण्यापूर्वीच रशियाने हा ड्रोन हल्ला केला आहे. गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर रशियाकडून हल्ले वाढवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. जेट इंजिनचा वापर करून ड्रोन हल्ले करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मध्य कीवमधील सरकारी इमारतींवरील हल्ले त्या तुलनेत कमी असले तरी रशियाची आगळीक योग्य नसल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

शांतता चर्चेला ब्रेक लागण्याची शक्यता

झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना युद्ध बंदीचा प्रस्ताव पाठवला, त्यानंतरही ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. गेल्या काही महिन्यात रशिया वारंवार आगळीक करत असल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात येत आहे. सध्या अमेरिकेचे लक्ष मध्य आखातात, इराणवर आहे. तिथे युद्ध सुरू असल्याने रशियासोबतच्या चर्चेच्या फेऱ्यांना खीळ बसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षे उलटली आहेत. हा द्वितीय महायुद्धापेक्षा अधिक काळचा संघर्ष मानला जात आहे. या युद्धात हजारो नागरिकांसह सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका