AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WMC संघटनेच्या शिष्टमंडळाची नेपाळला भेट, नेपाळच्या उद्योगमंत्र्यांची पूर्ण सहकार्याची हमी

वर्ल्ड मल्याळी काऊन्सील म्हणजेच WMC ही जगभरात ओळखली जाणारी प्रसिद्ध अशी संघटना आहे. या संघटनेमार्फत जगभरातील मल्याळी नागरिकांच्या हितासाठी काम केले जाते. या संस्थेच्या प्रतिनिधींनी नुकतेच जपानला भेट दिली.

WMC संघटनेच्या शिष्टमंडळाची नेपाळला भेट, नेपाळच्या उद्योगमंत्र्यांची पूर्ण सहकार्याची हमी
wmc nepal
| Updated on: Jul 31, 2025 | 9:38 PM
Share

वर्ल्ड मल्याळी काऊन्सील म्हणजेच WMC ही जगभरात ओळखली जाणारी प्रसिद्ध अशी संघटना आहे. या संघटनेमार्फत जगभरातील मल्याळी नागरिकांच्या हितासाठी काम केले जाते. या संस्थेच्या प्रतिनिधींनी नुकतेच जपानला भेट दिली. नेपाळमधील संबंध मजबूत व्हावेत म्हणून विकासाच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी WMC संघटनेच्या प्रतिनिधींनी नेपाळला भेट दिली होती. या संघटनेच्या  शिष्टमंडळाचे नेतृत्व गोल्बल प्रेसिंडेट डॉ. बाबू स्टीफन यांनी केले. त्यांचे नेपाळमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी नेपाळचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री दामोदीर भंडारी हे उपस्थित होते.

नेपाळमधील कामाला आमचे पूर्ण सहकार्य असेल

या नेपाळ भेटीदरम्यान स्टीफन यांची भंडारी यांच्यीशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी भंडारी यांनी WMC या संघटनेच्या नेपाळमधील कामाला आमचे पूर्ण सहकार्य असेल असे आश्वासन दिले. तसेच नेपाळमधील मल्याळी उद्योजकांना नवे उद्योग उभे करण्यासाठी प्रोत्साहितही केले.

भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांचीही भेट

नेपाळच्या भेटीतील शिष्टमंडळात नवनियुक्त सरचिटणीस शाजी मॅथ्यू मुलामुटिल आणि उपाध्यक्ष सुरेंद्रन कन्नट यांचाही समावेश होता. या शिष्टमंडळाने नेपाळमधील मल्याळी समुदायाचे प्रतिनिधी आणि भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.

नुकतीच WMC या संघनटेची बँकॉकमध्ये एक जागतिक परिषद झाली. या परिषदेनंतर WMC च्या शिष्टमंडळाने नेपाळला भेट दिली. लवकरच या शिष्टमंडळाची नेपाळच्या पंतप्रधानांशीही भेट होणार आहे.

WMC काय काम करते?

जागतिक पातळीवर काम करणाऱ्या या संघटनेचे मुख्यालय अमेरिकेतली न्यू जर्सी येथे आहे. या संघटनेकडून बऱ्याच काळापासून जगभरातील मल्याळी जनतेशी संवाद साधला जातो. तसेच जगभरातील मल्याळी जनतेला जोडण्याचे काम या संघटनेकडून केले जाते. तसेच या संघटनेच्या माध्यमातून जगभरात सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन दिले जाते.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.