99% प्रवाशांना माहीत नसतं, रेल्वे प्रवासादरम्यान धक्के का जाणवतात? जाणून घ्या यामागचं कारण

रेल्वेगाडीत बसलेले असताना जाणवणारा अचानक झटका आणि 'खडखड' असा आवाज येतो. तेव्हा आपल्याला वाटतं की काही तरी बिघाड झाला आहे. पण यामागचं योग्य कारण कदाचित तुम्हाला माहित नसेल.

99% प्रवाशांना माहीत नसतं, रेल्वे प्रवासादरम्यान धक्के का जाणवतात? जाणून घ्या यामागचं कारण
Why train jerks rail joints coupling explained
| Updated on: Nov 27, 2026 | 12:30 PM

तुम्ही कधी ना कधी ट्रेन प्रवास केलाच असेल. अनेकदा या प्रवासात अचानक जोरात झटका लागतो किंवा मग खडखड असा आवाज येतो. हे सामान्य आहे. पण अनेकदा विचार येतो की असं का होतं? हे म्हणजे काही खराबी आहे का? पण तसं नाहीये. प्रत्यक्षात असे धक्के मिळण्यामागे तांत्रिक कारणे असतात. याची दोन मुख्य कारणे आहेत: रुळांमधील सांधे आणि रेल्वेच्या डब्यांना एकमेकांशी जोडणारे ‘कपलिंग’!

नेमकं कारण काय?

रेल्वेच्या रुळांमधून येणाऱ्या ‘खडखड’ आवाजाचे खरे कारण म्हणजे हे रूळ लोखंडाचे बनलेले असतात. खरतर लोखंड हा असा धातू आहे जो उष्णतेमुळे विस्तारतो आणि थंडीमुळे आकुंचन पावतो. जर हे रूळ कोणतीही जागा न सोडता पूर्णपणे एकमेकांना जोडून बसवले, तर तीव्र उष्णतेच्या काळात ते प्रसरण पावल्यामुळे वाकू शकतात. अभियांत्रिकी भाषेत याला ‘रेल बकलिंग’ असे म्हणतात. या रेल बकलिंगमुळे रेल्वे रुळावरून घसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी, रुळांच्या दोन भागांमध्ये काही मिलिमीटरची थोडी जागा सोडली जाते. त्यानंतर, ‘फिशप्लेट्स’ नावाच्या धातूच्या पट्ट्या आणि बोल्ट्सच्या साहाय्याने हे भाग एकमेकांना जोडले जातात.

Loading...

जेव्हा रेल्वेचे चाक या फटीवरून जाते, तेव्हा पुढच्या रुळावर चढण्यापूर्वी ते क्षणभर थोडे खाली झुकते. यामुळे खड-खड असा आवाज येतो. अनेकदा हलकासा सौम्य झटकाही जाणवतो. रेल्वेचा वेग जितका जास्त, तितक्या वेगाने हा आवाज ऐकू येतो. पूर्वीच्या काळी लोक या लयबद्ध आवाजावरून रेल्वेचा वेग ओळखत असत.

आता का कमी होत आहेत रेल्वे मार्गांवर जॉइंट्स?

आता अलीकडे हे जॉइंट्स कमी होत जात आहेत. याचा कारण म्हणजे आधुनिक रेल्वे जाळ्यांमध्ये ‘लॉन्ग वेल्डेड रेल्स’ (LWR) चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या प्रोसेस मध्ये रेल्वे रुळांचे तुकडे वेल्डिंगद्वारे एकमेकांना जोडून एक सलग आणि अत्यंत लांब रूळ तयार केला जातो, ज्यामुळे सांध्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होते. म्हणूनच नवीन रेल्वे मार्गांवर किंवा अतिवेगवान मार्गांवर प्रवास करताना तो अधिक सुखद वाटतो आणि रेल्वेच्या चाकांमुळे होणारा तो विशिष्ट लयबद्ध आवाजही खूप कमी ऐकू येतो. तापमानातील बदलांमुळे रुळांचे होणारे प्रसरण हाताळण्यासाठी, हे रूळ एका विशिष्ट आणि नियंत्रित तापमानाला बसवले जातात व त्यांची देखभालही त्याच पद्धतीने केली जाते.

भारतीय रेल्वे सातत्याने एलएचबी (LHB) कोच आणि वेल्डेड ट्रॅकचा वापर वाढवत आहे. म्हणूनच, नवीन गाड्यांमधून प्रवास करणे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक वाटते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us