AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नको तेच घडलं… 120km स्पीडने आलं भयानक संकट, 400 उड्डाणं रद्द; 100 वर्षात पहिल्यांदाच सर्वत्र अंधार

अमेरिकेत 120km वेगाने आलेल्या भयानक नॉरईस्टर वादळामुळे हाहाकार माजला आहे. 9 लाखांहून अधिक घरांची वीज गेली असून, 400 उड्डाणे रद्द झाली आहेत. 100 वर्षांत पहिल्यांदाच थँक्सगिव्हिंग डे परेड रद्द झाली. देशाच्या मध्य आणि पूर्वेकडील भागाला मोठा फटका बसला आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नको तेच घडलं... 120km स्पीडने आलं भयानक संकट, 400 उड्डाणं रद्द; 100 वर्षात पहिल्यांदाच सर्वत्र अंधार
US Nor'easter StormImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 12:25 PM
Share

ज्याची भीती होती तेच अखेर घडलं. अमेरिकेत भयानक वादळाने तांडव घातलं आहे. सुपर पॉवर अमेरिकेत अतिभयानक वारे वाहत असून त्यामुळे सर्वत्र हाहा:कार उडाला आहे. वादळामुळे झाडं उन्मळून पडली आहे. विजेचे खांब उलथल्याने सर्वत्र अंधार पसरला आहे. त्यामुळे थँक्सगिव्हिंग सारखा सणही नागरिकांना साजरा करता आला नाही. 100 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं आहे. देशाच्या मध्य आणि पूर्वेकडील भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसाचा लाखो नागरिकांना फटका बसला आहे.

चक्रीवादळामुळे अमेरिकेतील 9 लाखाहून अधिक घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठाणांची बत्ती गुल झाली आहे. तब्बल 400 उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच फरफट झाली आहे. सर्वाधिक आश्चर्यकारक बाब म्हणजे, प्रसिद्ध मॅसिज थँक्सगिव्हिंग डे परेड पहिल्यांदा रद्द करण्यात आली आहे. या परेडच्या 100 वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे. वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे आयोजकांनी ही परेड स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वत्र हाहा:कार

हवामानाच्या या खतरनाक सिस्टिमला नॉरईस्टर म्हटलं जातं. त्याच्या प्रभावामुळे अमेरिकेच्या अनेक राज्यात अतिवृष्टी आणि वादळ आलं आहे. पेन्सिल्वेनिया, मेरीलँड आणि व्हर्जिनियामध्ये सर्वाधिक परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. वेगाने वारे वाहत आहेत. जमिनीतील ओलावा वाढल्याने मोठी झाडे मुळासकट उन्मळून वीजवाहिन्यांवर आणि घरांवर पडत आहेत. त्याचा वीज पुरवठ्यावर प्रचंड परिणाम झाला आहे. अमेरिकेतील अनेक भाग अंधारात गेले आहेत. लोकांना विजेशिवाय राहावे लागत आहे. वॉशिंग्टनच्या आसपासच्या मेरीलँड परिसरात परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. प्रशासनाने या ठिकाणच्या सुमारे 20 लाख ग्राहकांना पाण्याचा कमी वापर करण्याचं आवाहन केलं आहे. बत्ती गुल झाल्याने पाणी पुरवठा व्यवस्था बाधित होण्याची भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे.

वादळाने हवाई सेवा बाधित

या वादळाने अमेरिकेतील परिवहन व्यवस्था कोलमडून टाकली आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटअवेयरच्या आकडेवारीनुसार, देशभरातील 400 उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. तर 2000 हून अधिक उड्डाने उशिराने सुरू आहेत. पूर्व अमेरिकेत याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

वादळीवाऱ्यामुळे मोठे पूल बंद करण्यात आले आहेत. गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, असे आदेशच प्रशासनाने दिले आहेत. न्यू जर्सीच्या गव्हर्नर मिकी शेरिल यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तुमचे मोबाईल चार्ज करून ठेवा, विजेच्या तारांपासून दूर राहा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

समुद्र खवळला

अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर हवामानाने अडचणी वाढवल्या आहेत. कॅलिफोर्नियाच्या समुद्रात प्रचंड लाटा उसळत आहेत. समुद्र खवळल्याने या परिसरात फिरकण्यास मनाई करण्यात आली आहे. फ्रान्सिसकोमध्येही अतिवृष्टी झाली आहे. एकूणच अमेरिकेला हवामानाच दुहेरी फटका बसला आहे. एकीकडे पूर्वेकडील भागात प्रचंडा वादळ, पूर आणि विजेचं संकट निर्माण झालं आहे, तर दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर समुद्राच्या उंचच उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे देशावर संकट आलं आहे. तर दुसरीकडे लाखो नागरिकांच्या सुट्ट्या आणि सणांवर पाणी फेरलं गेलं आहे.

Follow Us
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?
देशातील लोकशाहीच्या पाठीवर; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या...
Sanjay Raut : देशातील लोकशाहीच्या पाठीवर...; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या हातात, संजय राऊतांचा मोठा दावा
शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत....
Sanjay Raut :  शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत..; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा....
Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम