पक्ष्यांना नसतात कान, मग ऐकू कसे येते? जाणून घ्या निसर्गाची अद्भूत किमया
Birds Ear: पक्षी हे परिसरातील आवाजाबद्दल संवेदनशील असतात. ते धोका लागलीच ओळखतात. काही पक्षी विशिष्ट आवाज काढून धोक्याची सूचना देतात. पण पक्ष्यांना कान नसतात, मग त्यांना ऐकू कसे येते?

Birds Ear: झाडांवर चिवचिवट करणारे पक्षी आपण पाहिले असतील. पक्षी हे परिसरातील आवाजाबद्दल संवेदनशील असतात. ते आसपासचा धोकाही लवकर ओळखतात आणि इतर पक्षांना एक विशिष्ट हाळ काढून धोक्याची सूचना देतात. माणसांसह अनेक सस्तन प्राण्यांना डोक्याच्या दोन्ही बाजूला कान असतात. पण पक्ष्यांना असे बाह्य कान दिसत नाहीत. मग पक्ष्यांना आवाज कसा ऐकू येतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर त्यांच्यासाठी निसर्गाने एक खास रचना केली आहे.
बाह्य कान नसले तरी अंतर्गत रचना कशी?
पक्ष्यांना माणसांसारखी अथवा सस्तन प्राण्यांप्रमाणे कान नसतात. तर त्यांच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला साधारणपणे डोळ्यांच्या मागे आणि किंचित खालील बाजूला अंतर्गत श्रवणेंद्रिय असतात. ही छिद्रे बाहेरील बाजूने सहज दिसत नाहीत. यासाठी त्यावर प्रकारची मऊ, बारीक पिसे असतात. या पिसांमुळे कानाच्या छिद्रांचे धूळ, कचरा आणि इतर बाह्य घटकांपासून संरक्षण होते. ध्वनीलहरी आत जाण्यास पंखाने अडथळा येत नाही. या कानाला हवेच्या झोताचा त्रास होत नाही. धुळीचा त्रास होत नाही.
हवेच्या दाबाचा होत नाही परिणाम
पक्ष्यांना बाह्य कान नसल्यामुळे पक्ष्यांना एक मोठा फायदा होतो. त्यांना हवेत झेप घेताना आणि शारीरिक हालचाल करताना अडथळा येत नाही. जर पक्ष्यांना बाह्य मोठे कान असते. तर आकाश उडताना हवेचा वेग आणि घर्षण वाढले असते. त्यांच्या हवेतील वावर सहज सोपा झाला नसता. त्यांच्या वेगावर परिणाम झाला असता. यामुळेच निसर्गाने त्यांना गुळगुळीत आणि सुटसुटीत रचना दिली आहे. ध्वनीलहरी या लपलेल्या छिद्रांमधून आतील कानापर्यंत पोहोचतात. याठिकाणी आवाज ओळखणाऱ्या पेशी असतात. त्यांच्या मदतीने मेंदूकडे संदेश पाठवला जातो. त्या आधारे पक्षी आवाज ओळखतात. दिशा ठरवतात आणि संवादासोबतच धोक्याचीही चाहुल त्याला मिळते.
संवादच नाही तर शिकारीसाठी रचना महत्त्वाची
अनेक पक्ष्यांसाठी आवाज ओळखणे संवादासाठीच नाही तर शिकारीसाठीही महत्त्वाच ठरते. पक्षी त्यामाध्यमातून जोडीलादाराल साद घालतो. पिलांचे आवाज ऐकतो. भक्ष्याची हालाचल टिपतो. तर संभाव्य धोक्यापासून सावध राहण्यासाठी श्रवणशक्ती महत्त्वाची ठरते. रात्री सक्रिय राहणाऱ्या अथवा शिकार करणाऱ्या पक्ष्यांमध्ये श्रवणशक्ती अत्यंत तीक्ष्ण असते. बाह्य कान नसताना एका विशिष्ट रचनेमुळे ऐकण्याची किमया साधली जाते.