AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : सलमान खानच्या वडिलांसाठी गर्लफ्रेंडची खास पोस्ट, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

Salman Khan : अभिनेता सलमान खान याच्या वडिलांसाठी गर्लफ्रेंडने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. शिवाय भावना देखील व्यक्त केल्या आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Salman Khan : सलमान खानच्या वडिलांसाठी गर्लफ्रेंडची खास पोस्ट, 'तो' फोटो शेअर करत म्हणाली...
Salman Khan
| Updated on: Nov 25, 2026 | 2:01 PM
Share

Salman Khan : अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. फक्त सलमान खानच नाही तर, भाईजानचे कुटुंबिय देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. सध्या अभिनेत्याचे वडील आणि प्रसिद्ध स्क्रीनरायटर सलीम खान आणि कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर देखील चर्चेत आहे. नुकताच सलीम खान यांनी 91 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. अनेकांनी सलीम खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण ज्या अंदाजाच यूलिया वंतूर हिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे, त्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलीम खान आणि यूलिया वंतूर यांची चर्चा रंगली आहे.

यूलिया वंतूर हिने इन्स्टाग्रामवर सलीम खान यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये यूलिया वंतूर आणि सलीम खान खास क्षणांचा आनंद घेताना दिसत आहेत. फोटो पोस्ट करत यूलिया कॅप्शनमध्ये म्हणाली, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एका अत्यंत सुंदर आणि समजूतदार व्यक्तीला, ज्यांनी मला नेहमीच ही जाणीव करून दिली की मी देखील या कुटुंबाचा एक भाग आहे आणि हेच माझे घर आहे. मी तुमच्यासाठी फक्त प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करते. तुम्ही नेहमी सुरक्षित, खंबीर आणि आनंदी राहा.” सध्या यूलिया हिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एवढंच नाही तर, आणखी एक फोटो पोस्ट करत यूलिया म्हणाली, ‘एकमेकांवर प्रेम करा, नाहीतर सगळं काही संपून जाईल. कुटुंबाच्या खंबीर आधारासाठी आणि अत्यंत सुंदर व समजूतदार व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही मला नेहमीच आपलेपणा दिला आणि घर असल्यासारखे वाटायला लावले. तुमच्यासाठी नेहमीच प्रेम आणि कृतज्ञता.’, पोस्टवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

यूलिया वंतूर आणि सलमान खान

सलमान आणि यूलिया यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांसोबत आहे. पण अद्याप दोघांनी देखील नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. यूलिया आणि सलमान खान यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, सलमान खान याचं वय 59 वर्ष आहे. तर यूलिया हिचं वय 44 वर्ष आहे. म्हणजे सलमान आणि यूलिया यांच्या वयात 15 वर्षांचं अंतर आहे.

Follow Us
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...
राऊतांच्या आरोपांना शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊतांच्या आरोपांना संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला...
Amravati : 2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला कायदेशीर नोटीस
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर मुबई हायकोर्ट मध्ये सुनावणी...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर मुबई हायकोर्ट मध्ये सुनावणी
नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, दिपके नागपूरला रवाना
CJP Protest : नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, अभिजित दिपके नागपूरला रवाना
राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा...
Raj thackeray : राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा; निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राऊतांचा शिंदे...
Sanjay Raut : लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल