
Health Insurance : कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा देते. विमा ( Health Policy ) सुविधा हा देखील यातीलच एक भाग आहे. पण ज्यांच्याकडे समूह आरोग्य विमा आहे ते स्वतंत्र वैयक्तिक आरोग्य योजना खरेदी करण्याचा विचार करत नाहीत. ते आरोग्य विम्यावर आणखी पैसे गुंतवण्यासाठी तयार नसतात. कॉर्पोरेट विमा असल्याने ते वैयक्तिक विम्याला महत्त्व देत नाहीत. पण असं करणं महागात पडू शकतं. कारण कंपनीने दिलेल्या आरोग्य विम्यावर अवलंबून राहणे योग्य नाही.
आरोग्य कधी बिघडेल हे कोणीही सांगू शकत नाही. तुम्ही कंपनीचा विमा घेतला असला तर त्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. कारण जेव्हा तुम्ही तुम्ही कंपनी सोडता किंवा निवृत्त होता तेव्हा त्या कंपनीचा तुम्ही भाग नसता. त्यामुळे ती विमा पॉलिसी तुम्हाला लागू होत नाही. त्यामुळे तुम्हाला अशा वेळी विमा संरक्षण हवे असेल तर तुम्ही स्वतंत्र आरोग्य विमा खरेदी केला पाहिजे.
आरोग्य विमा संरक्षण घेण्याचे अनेक फायदे आहेत. वाढत्या वयानुसार आपला खर्च देखील वाढत जातो. तसा जीवन विम्याचा प्रीमियम देखील वाढतो. वाढत्या वैद्यकीय खर्चानुसार कंपनी तुम्हाला पुरेसे कव्हर देत आहे का आणि सेवानिवृत्तीनंतरही कंपनीचे कव्हर कायम राहील का, हे तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही स्वतंत्र आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केली पाहिजे.
स्वतंत्रपणे आरोग्य विमा खरेदी केला तर तुम्हाला त्यातून कर सवलतीचा लाभही मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80D नुसार, तुम्ही एका वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 रुपये आणि कुटुंबातील इतरांसाठी 25,000 रुपयांपर्यंतच्या पॉलिसीवर भरलेल्या प्रीमियमवर कर कपातीचा लाभ घेऊ शकता.