AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : कोलकातात पोलिसांच्या वर्दीचा रंग पांढरा का ?

देशाच्या इतर राज्यात पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकी असून त्यांचा वेगळा दरारा आहे. मात्र, कोलकाता येथील पोलिसांच्या युनिफॉर्मचा रंग पांढरा आहे. काय आहे या वर्दीच्या रंगा मागची कहाणी हे वाचूयात....

GK : कोलकातात पोलिसांच्या वर्दीचा रंग पांढरा का ?
KOLKATA POLICE WHITE UNIFORM
| Updated on: Apr 28, 2026 | 11:43 PM
Share

Kolkata Police Uniform: पश्चिम बंगालमध्ये निवडणूकांच्यामुळे कोलकाता हे शहरही चर्चेत आहे. कोलकाता हे शहर अनेक कारणांमुळे प्रसिद्धीला आले आहे. त्यात येथील पोलिसांच्या वर्दीचा पांढरा रंग देखील चर्चेचा विषय असतो. कारण देशातील उर्वरित राज्यात खाकी रंग पोलिसांसाठी असताना कोलकातात यास फारकत कशी काय असा सवाल नेहमीच चर्चेत असतो. या मागे नेमकी काय कारणे आहेत याची माहिती घेऊयात…

एक अनोखी विरासत

या अनोख्या परंपरेचा इतिहास १६९० पर्यंत जातो. या काळात जॉब चारनॉक या भागात आले होते आणि त्यांनी आधुनिक कोलकाताची पायाभरणी केली. जसजसे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आजूबाजूच्या गावांवर आपले नियंत्रण सरु केले आणि प्रशासकीय नियंत्रण राबवणे सुरु केले. तेव्हा औपचारिक पोलिस यंत्रणेची गरज निर्माण झाली. १८४५ नंतर जेव्हा कोलकाता पोलिस दलाची स्थापना झाली. तेव्हा ब्रिटीशांनी या फोर्सला एक वेगळी ओळख देण्यासाठी वर्दीचा रंग पांढरा निवडला. आणि आजही ओळख कायम आहे.

हवामानही कारणीभूत

कोलकाताचे हवामान हे प्रतिकूल आहे.येथे उष्णता जास्त असते. आद्रता आणि थकवणारे वातावरण असल्याने येथे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर पांढरा रंग सुर्याच्या प्रकाशाला रिफेक्ट करत आणि उष्णतेसा कमी शोषतो. त्यामुळे येथील पोलिस अधिकाऱ्यांना दिवसभर या वर्दीत काम करताना आरामदायी वाटते. दीर्घकाळ बाहेर राहून उन्हाताणात काम करताना पांढरा रंग त्यांना फायद्याचा ठरतो. उलट खाकी रंग हा जास्त उष्णता शोषतो. या प्रकारच्या हवामानासाठी खाकी ऐवजी पांढराच रंग चांगला आहे.

शहर पोलिसांची वेगळेपणा –

पश्चिम बंगाल पोलिस भारताच्या बहुतांशी राज्यांसारखेच मानक खाकी वर्दीला परिधान करतात. मात्र, कोलकाता पोलिसांनी पांढरी वर्दीत आपली वेगळी ओळख आणि शहर पोलिस आणि राज्य पोलिसांमध्ये फरक सहज कळावा यासाठी देखील हा फरक कायम ठेवला आहे.

उर्वरित राज्यात खाकी वर्दी का ?

खाकी वर्दी याची देखील एक स्वतंत्र कहानी आहे. १८४७ मध्ये जेव्हा भारतात ब्रिटीश शासन सुरु असताना हॅरी लम्सडेन यांनी पोलिसांच्या वर्दीचा खाकी रंग सुरु केला होता. तेव्हा यामागे साधेसे कारण होते. पांढरा रंग लवकर मळतो. खाकी रंग सहज मळत नाही. मळला तरी पटकन समजून येत नाही, त्यामुळे भारतासारख्या देशात असा मळखाऊ रंग पोलिसांसाठी देण्यात आला.

Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी