केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल डिझेलच्या विंडफॉल टॅक्समध्ये थेट बदल, जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा भाव..

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आले. पेट्रोल डिझेलच्या किंमती गगणाला पोहोचल्या होत्या. त्यातच भारत सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल डिझेलच्या विंडफॉल टॅक्समध्ये थेट बदल, जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा भाव..
petrol and diesel prices
| Updated on: Nov 02, 2026 | 8:25 AM

इराण आणि अमेरिका युद्धात सतत पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यातच 1 नोव्हेंबरपासून अनेक गोष्टींच्या किंमतीमध्ये बदल करण्यात आली. ग्राहकांच्या खिशाला यामुळे झळ बसणार आहे. त्यातच मोदी सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवीर टॅक्स म्हणजेच विंडफॉल झिरो केले. डिझेलच्या किंमती 3 रूपये प्रति लीटर वाढवल्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर कोणताही परिणाम पडणार नाही. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला की, जगात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होते. अमेरिका इराणवर सर्वात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जातंय. अमेरिकेमधील निवडणुकीमध्ये सध्या इराणवरील हल्ले थांबवण्यात आलीत. जागतिक बाजारात तणाव वाढला की, सोने आणि चांदीच्या भागात मोठी घसरण होते.

भारतात सतत सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत. त्यातच पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची दाट शक्यता असतानाच आजचा 2 नोव्हेंबर 2026 चे पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाहीर झाली आहेत. भारतीय तेल कंपन्या LOCL, HPCL आणि इंडियन ऑयल कंपन्यांनी दिलासा दिला. 2 नोव्हेंबर रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी चढउतार बघायला मिळतंय.

Loading...

बेंचमार्क दिल्लीमध्ये पेट्रोल 102.12 रूपये तर डिझेल 95.20 रूपये प्रती लीटरवर आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतीत बदल होत आहेत. भारतातही काही महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठे बदल झाले. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगणाला पोहोचल्या आहेत. शिवाय तिथे मोठा तुटवडा देखील आहे. श्रीलंका, चीन, बांग्लादेश, नेपाळ या भारताच्या शेजारी देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भारताच्या तुलनेत खूप जास्त आहेत.

भारतीय तेल कंपन्यावर तणाव आहे. पण भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोलचे दर स्थिर ठेवल आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात भारतात महागाई वाढताना दिसली. भारतात पेट्रोलचा मोठा तुटवडा बघायला मिळाला. एलपीजी गॅसच्याही किंमती वाढल्या. काही प्रमाणात एलपीजी गॅसचा तुटवडाही भारतात होता. पश्चिम आशियात संकट आहे. त्यातच भारताने विंडफॉल टॅक्समध्ये बदल केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us