‘जंगल बुक’चे लेखक, भारताला क्रिकेटची गोडी लावणारे ब्रिटीश गव्हर्नर आणि पाकिस्तानचे जनक एकेकाळी होते पक्के मुंबईकर, काय आहे इतिहास

मुंबईत ब्रिटीशकाळात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे बस्तान होते. या शहरात ब्रिटीशांच्या काळात 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. खरंतर साल1857 ला आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठीचे पहिले समर म्हटले जाते. मुंबईतून इंग्रजांना 'चले जाव' सांगणारी चळवळ सुरु झाली. कदाचित भारत-पाकिस्तानच्या फाळणीचे बिजे देखील मुंबईतच मलबार हीलच्या बंगल्यावर रुजली असतील...

'जंगल बुक'चे लेखक, भारताला क्रिकेटची गोडी लावणारे ब्रिटीश गव्हर्नर आणि पाकिस्तानचे जनक एकेकाळी होते पक्के मुंबईकर, काय आहे इतिहास
Rudyard kipling, pakistan founder jinnah,lord harris Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 7:36 PM

मुंबई : भारतावर ब्रिटीशांचा अंमल असताना मुंबईत अनेक नामीगिरामी हस्ती रहात होत्या. ज्यांच्यामुळे आपल्या देशाचा भुगोलही बदलला. यात एकेकाळी दुरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ‘मोगली’ ही कार्टून सिरियल ज्यावर बेतली होती, त्या ‘दि जंगल बुक’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे निवासस्थान तसेच भारतात क्रिकेटचा खेळ रुजविणारे लॉर्ड हॅरीस यांचे निवासस्थान आणि भारताची फाळणी करुन पाकिस्तानची निर्मिती करण्यास भाग पाडणारे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. आज या प्रॉपर्टीची किंमत अब्जावधीमध्ये गेली आहे. ही स्थळे मुंबईतच आहेत. आपल्या नेहमीच्या रस्त्यावर असूनही देखील तरुण पिढीला कदाचित या वास्तूंबद्दल पुरेशी माहीती नसू शकते. त्यामुळे मुंबईतील ब्रिटीशकालीन इतिहासात सैर करुन येऊयात…

रुडयार्ड किपलिंग

मुंबईतील जे.जे.कला महाविद्यालय प्रसिध्द आहे. अनेक कलावंत या महाविद्यालयातून केलेचे शिक्षण घेऊन पुढे जगप्रसिद्ध झाले आहेत. या जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्यांना मुलांना येथील रम्य प्रांगणात एक जुना पुरातन बंगला नेहमीच खुणावत असतो. तत्कालिन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या जुन्या मोडकळीला आलेल्या बंगल्याचे पुरातन हेरीटेज जपत नुतनीकरण केले आहे. या 142 वर्षांपूर्वी (साल 1882 ) बांधलेल्या या बंगल्यात लेखक, कवी रुडयार्ड किपलिंग यांचे वडील जॉन लॉकवूड किपलिंग रहात होते. ब्रिटीशकाळात जेव्हा जे. जे.कला महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यावेळी जॉन लॉकवू़ड या महाविद्यालयाचे पहिले प्रोफेसर झाले नंतर ते या महाविद्यालयाचे डीन झाले. ते त्यांची पत्नी एलिस यांच्यासोबत या बंगल्यात रहायचे. हा बंगला नंतर अगदी साल 2000 पर्यंत जे.जे.कला महाविद्यालयाच्या डीनचे निवासस्थान म्हणून सेवा देत होता.

जॉन लॉकवूड कोण होते

जॉन लॉकवूड यांनी ब्रिटीशकाळात जे.जे.कला महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात मोठी भूमिका बजावली. 1888 मध्ये ब्रिटीशांनी जेव्हा जीआयपीआर रेल्वेचे मुख्यालय म्हणून व्हीक्टोरिया टर्मिनस या स्थानकांची बांधणी पूर्ण केली. त्यावेळी या गॉथिक शैलीतील या इमारतीचे आर्कीटेक्ट फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन यांनी ही इमारत बांधली तेव्हा या इमारतील अनेक शिल्पं जॉन लॉकवूड किपलिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जे.जे.कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केली होती. जॉन लॉकवूड किपलिंग आणि त्यांच्या जे.जे.च्या विद्यार्थ्यांनी क्रॉफर्ड मार्केट येथील इमारतीवरच्या सज्ज्यातील कोरीव काम देखील केले.

जॉन लॉकवूड किपलिंग यांचा जन्म 6 जुलै 1837 मध्ये उत्तर इंग्लंड येथील यॉर्कशिर येथे झाला. त्यांनी चित्रकला, रेखाचित्र, स्थापत्य रेखांकन यात इतिहास घडविला, ते मुंबईतील जे.जे. महाविद्यालयाचे डीन झाल्यानंतर त्यांनी फोर्ट अनेक सुंदर इमारतींची शिल्पे त्यांच्या विद्यार्थ्यांमार्फत घडविली. नंतर 1893 मध्ये ते लाहोर येथील मायो स्कूल ऑफ आर्टचे प्रिन्सिपल ( आता नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्स ) झाले. त्यांनी लाहोरच्या सेंट्रल म्युझियमचे क्युरेटर म्हणून काम पाहीले. illustration वर त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. तसेच त्यांच्या पत्नीसह त्यांनी पत्रकारीताही केली. त्यांचा मुलगा रुडयार्ड किंपलिंग लेखक आणि कवी म्हणून उदयाला आला. ज्याचे ‘दि जंगल बुक’ हे नॉव्हेल खूपच गाजले.

फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन

ब्रिटीश आर्कीटेक्ट फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन यांनी आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( व्हीक्टोरीया टर्मिनस ) इमारत, मुंबई महानगर पालिकेची इमारत, रॉयल अल्फ्रेड सेलर्स होम, काळा घोडा येथील आर्मी अॅण्ड नेव्ही बिल्डींग, अपोलो बंदर येथील पोस्ट ऑफीस म्युज, चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय ( BB & CI ), फ्लोरा फाऊंटन येथील ओरिएंटल लाईफ एश्युरंस ऑफीस, तसेच मेहसाना येथील राजमहल पॅलेसचे डिझाईन देखील त्यांनी तयार केली होती. त्यांचे निधन 5 मार्च 1900 रोजी मलेरियाने मुंबईतच झाले. मुंबईच्या शिवडी येथील स्मशानभूमीत त्यांना दफन करण्यात आले.

मुंबईतील फोर्ट येथील सीएसएमटी येथील इमारतीच्या शिल्पं आणि रेखाकृती यांची मूळ डिझाईन जॉन लॉकवूड किपलिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जे.जे.कलामहाविद्यालयातील त्यांच्या विद्यार्थ्यांनी केली आहेत. या इमारतीच्या मुख्य घुमटावर प्रगतीच्या देवीचा पुतळा आहे. एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात चाक असा हा पुतळा आहे. या पुतळ्यावर वीज पडल्याने पुतळ्याचे शीर काही वर्षांपूर्वी तुटले होते. त्यानंतर जे.जे.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हुबेहुब तसेच साजेशे पुतळ्याचे शीर बनविले. ते नंतर येथे चिकटविण्यात आले.

मोहम्मद अली जिना

भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास मांडताना फाळणीच्या जखमांना कोणी विसरु शकत नाही. भारताची फाळणी करण्यात ब्रिटीशांच्या कूटनिती सोबत बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांची महत्वाकांक्षा देखील कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानचे जनक कायदे-ए-आझम राष्ट्रपिता मोहम्मद अली जिना यांचे निवासस्थान मुंबईतील पॉश इलाक्यात मलबार हील येथे आहे. या युरोपीयन शैलीच्या बंगल्याची किंमत आजच्या जमान्यात एक हजार कोटी रुपये असेल असे म्हटले जाते. या बंगल्यातून समुद्राचा गार वारा खायला मिळतो.

हा आलीशान बंगला साल 1936 साली बांधला होता. दक्षिण मुंबईतील मलबार हीलच्या हिरवळीवर 2.5 एकर जागेवरील हा बंगला उभा आहे. युरोपीयन आणि भारतीय स्थापत्यशैलीचे मिश्रण असलेल्या बंगल्यात हाय सिलींग, स्पेसियश रुम्स आणि बाल्कनीतून समुद्राचे दिसणारे सुखद दर्शन अशी या बंगल्याची रचना आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जिना या बंगल्यात राहायला यायचे. या बंगल्यात त्यांनी सर्व सुखसोयीची रेलचेल होती. आकर्षक इंटेरियर, लायब्ररी, स्टडी रुम्स आणि डायनिंग रुम्स अनेक बेडरुमची सोय आहे.

पत्नीसाठी बंगला बांधला

जिना यांच्या साल 1948 मध्ये झालेल्या मृत्यूनंतर हा बंगला अनेक वर्षे रिकामा होता. साल 1950 मध्ये भारत सरकारने शत्रू मालमत्ता कायद्यांतर्गत हा बंगला ताब्यात घेतला. या बंगल्याचे सरकारी स्मारकात रुपांतर करण्याचा प्रस्ताव साल 2018 रोजी आला होता. परंतू पाकिस्तानच्या जनकांचे स्मारक का करावे असा वाद निर्माण झाल्याने हा प्रस्ताव थंड्या बस्त्यात पडून आहे. या बंगल्याशी खरे तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या प्रेमप्रकरणाची कहानी जुळलेली आहे.

जिना यांचे पारसी मित्र सर दिनशॉ यांच्या 16 वर्षांच्या कन्येला 24 वर्षांनी मोठे असलेल्या मोहमंद अली जिना यांच्या विद्वतेची भुरळ पडली. आणि दोघांचे प्रेम जुळले. जिना यांनी 20 फेब्रुवारी 1918 मध्ये रत्तनबाई पेटीट हीच्या निकाह केला. त्या पारसी असल्याने या विवाहाला प्रचंड विरोध झाला तरी रत्तनबाई पेटीट हीने पळून जाऊन लग्न केले. जिनांचे आधीचे घर साऊथ कोर्ट मलबार हील येथे होते. परंतू ते रत्तनबाई पेटीट यांना आवडले नाही. त्यामुळे त्यांनी हा आलिशान बंगला बांधल्याचे म्हटले जाते. साल 2017 मध्ये भाजपाचे मंगलप्रभात लोढा यांनी पाकिस्तान निर्मितीची ही निशाणी पाडून टाका अशी मागणी करुन खळबळ उडविली होती.

लॉर्ड हॅरीस भारतातील क्रिकेटचा जनक

हॅरीस शिल्ड क्रिकेट ही प्रसिद्ध  क्रिकेट टुर्नामेंट आपण ऐकून आहोत. परंतू ज्यांच्या नावाने ही स्पर्धा सुरु झाली ते हॅरीस कोण होते ? हे अनेकांना माहीती नसेल. लॉर्ड हॅरीस हे ब्रिटीशकाळात मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांनी भारतात क्रिकेटची रुजवात केल्याचे म्हटले जाते. त्यांच्यामुळे भारताला क्रिकेटचे अक्षरश: वेड लागल्याचे म्हटले जाते. दक्षिण मुंबईतील लोकमान्य टीळक मार्गावर धोबी तलाव येथे आता त्यांच्या निवास स्थानात लॉर्ड हॅरीस उच्च माध्यमिक शाळा भरते. काही वर्षांपूर्वी ती मोडकळीस आल्याने तिचे पुनरुज्जीवीकरण सुरु करण्यात आले आहे.  हे कधी काळी मुंबईचे तत्कालिन गव्हर्नर लॉर्ड हॅरीस यांचे घर होते. येथे नंतर शाळा भरायला लागली. ही इमारत जीर्णशीर्ण झाल्याने येथील शाळा स्थलांतरीत करुन तिची दुरुस्ती करण्यात आली. लॉर्ड हॅरीस यांनी देशात क्रिकेटचे वेड आणल्याचे म्हटले जाते.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.