Railway History : मुंबईची चार रेल्वे स्थानके का बंद झाली ? कोणती होती ही स्थानके? ती कुठे होती? जाणून घ्या इतिहास
मुंबईची जीवनवाहीनी लोकल ट्रेन दररोज मुंबईकर चाकरमान्यांना स्वस्तात घर ते कार्यालय असा प्रवास घडवित असते. परंतू मुंबईचा इतिहास पाहिला तर बोरीबंदर ( मुंबई ) ते ठाणे ही देशातीलच नव्हे तर आशियातील पहिली ट्रेन धावली त्याला येत्या 16 एप्रिलला 171 वर्षे पूर्ण होणार आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानके नेहमीच गजबजलेली असतात. मात्र, मुंबईतील काही स्थानके काळाच्या ओघात बंद झाली. ती स्थानके कोणती होती, हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

बोरीबंदर स्थानक ते ठाणे दरम्यान आशियातील पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. येत्या 16 एप्रिलला या घटनेला तब्बल 171 वर्षे पूर्ण होतील. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अनेक स्थानके कालानुरुप अस्तित्वात आली तर काही स्थानके काळाच्या उदरात गडप झालीत. मुंबईत ब्रिटीशकाळात कार्यरत असलेली चार स्थानके आज अस्तित्वात नाहीत. या स्थानकांचा इतिहास मोठा रंजक आहे. या स्थानकांची गरज का संपली? त्या स्थानकांची नावे काय होती? ती कुठे होती? त्यांचा नेमका काय इतिहास आहे हे पाहूया ? ब्रिटीशांच्या काळात मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे अशी आशियातील पहिली ट्रेन 16 एप्रिल 1853 साली धावली होती. त्या काळात कापडाचा व्यापार...
