PM मोदींनी तोडला प्रोटोकॉल, पुतीन यांनीही केलं असं काही की… जगाला संदेश काय?
Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये मोठे करार झाले आहेत. अशातच आता पुतीन आणि मोदी यांच्या भेटीदरम्यान एक मोठा संदेश जगाला देण्यात आला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार झाले आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांचे विमानतळावर जात स्वागत केले. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये ऊर्जा, जहाज बांधणीसह अनेक क्षेत्रात महत्त्वाचे करार झाले. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीवेळी दोन्ही नेत्यांच्या कृत्याने सर्वांचे लक्ष वेधले. पंतप्रधान मोदी यांनी प्रोटोकॉल मोडला आहे, तर पुतीन यांनीही त्याला उत्तर देत एक लक्षवेधी कृत्य केले आहे. यामुळे जगाला एक वेगळा संदेश मिळाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
PM मोदींनी प्रोटोकॉल तोडला
भारतात जेव्हा एखाद्या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष येतात त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी त्यांचे स्वागत करत असतात. मात्र पंतप्रधान मोदींनी हा प्रोटोकॉल मोडत स्वतः विमानतळावर जात पुतीन यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींच्या या कृतीने रशियाला आनंद झाला. यातून भारत आणि रशियातील संबंध किती खास आहेत आणि दोन्ही नेते एकमेकांचा किती आदर करतात हे स्पष्ट होत आहे.
पुतीन यांनी हस्तांदलोनाची पद्धत बदलली
पंतप्रधान मोदींनी स्वागत केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली. त्यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोदींसोबत हात मिळवताना हस्तांदोलनाची पद्धत बदलली. पुतीन सामान्यतः लो ग्रिप स्टाईलने हस्तांदोलन करतात, मात्र दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधान मोदींना भेटताना त्यांची हस्तांदोलनाची पद्धत वेगळी होती. पुतीन यांनी मोदींसोबत सामान्यपणे हस्तांदलोन केले. मात्र पुतीन यांनी यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत लो ग्रिप स्टाईलने हस्तांदलोन करत होते.
पुतीन यांची लो ग्रिप स्टाईल काय आहे?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे कोणत्याही नेत्याला भेटतात तेव्हा ‘हँड ओव्हर हँड’ धोरण वापरतात. ते समोर असलेल्या नेत्याशी लो ग्रिप स्टाईलने हळूवारपणे हस्तांदोलन करतात. पुतीन यांचा हात दुसऱ्या नेत्याच्या हाताच्या वर ठेवलेला असतो. तज्ज्ञांच्या मते पुतीन या हस्तांदोलनाद्वारे प्रामुख्याने दोन संदेश देऊ इच्छितात. पहिला म्हणजे ‘मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि वर आहे.’ दुसरा संदेश म्हणजे, ‘मी पूर्ण नियंत्रणात आहे.’
पुतीन यांनी मोदींशी कसे हस्तांदोलन केले?
पुतीना यांनी पालम विमानतळ आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी सामान्यपणे हस्तांदोलन करत केले. याचा अर्थ दोघेही समान आहेत आणि कोणीही एकमेकांवर वर्चस्व गाजवत नाही. हे हस्तांदोलन करून, दोन्ही नेत्यांनी जगाला खासकरून अमेरिकेला असा संदेश दिला की अडथळे असूनही, दोन्ही देशांमधील संबंध घट्ट आहेत.
