Snake: असे ओळखा विषारी अन् विनविषारी साप, चावल्यावर करा हे उपाय

snake poisonous: विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखावे? यासंदर्भात प्राणीशास्त्रातील तज्ज्ञ डॉ.अनिल कुमार यांनी माहिती दिली. विषारी सापांची ओळख त्यांच्या त्यांच्या डोळ्यांना बाहुल्यावरुन होते. त्यांच्या बाहुल्या कापल्यासारख्या दिसतात.

Snake: असे ओळखा विषारी अन् विनविषारी साप, चावल्यावर करा हे उपाय
snake
| Updated on: Mar 16, 2025 | 5:56 PM

जगभरात साप चावल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भारतात सापच्या चाव्यामुळे अनेकांचे मृत्यू होत असतात. परंतु भारतात फार कमी विषारी साप आहेत. विषारी सापांपासून सावध राहण्याची गरज आहे. काही साप असे आहेत की ते किती विषारी आहेत, हे बघूनच ठरवता येईल. जरी साप चावला आणि विषारी नसला तरीही संसर्ग होण्याचा धोका असतो. शेती करताना शेतकऱ्यांना अनेकदा सापांचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत विषारी आणि बिनविषारी साप ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), जगभरात दरवर्षी सुमारे 45-54 लाख लोक सर्पदंशाचे बळी पडतात. त्यापैकी सुमारे 1.38 लाख लोकांचा मृत्यू होतो.

हा असतो फरक

विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखावे? यासंदर्भात प्राणीशास्त्रातील तज्ज्ञ डॉ.अनिल कुमार यांनी माहिती दिली. विषारी सापांची ओळख त्यांच्या त्यांच्या डोळ्यांना बाहुल्यावरुन होते. त्यांच्या बाहुल्या कापल्यासारख्या दिसतात. तसेच त्यांचा आकार अंडाकार असतो. त्यांचा रंग काळा असतो. ते आकाराने पातळ दिसतात. विषारी साप त्यांच्या डोक्यावरून देखील ओळखले जाऊ शकतात.

हे ही आहेत विषारी सापाची चिन्ह

  1. सापाच्या फणीवर घोड्याच्या नालसारखे पांढरे मुकुटाचे चिन्ह असेल तर समजावे की हा साप खूप विषारी आहे. ही खूण भारतात आढळणाऱ्या कोब्रावरही असते.
  2. विषारी सापाचा रंग काळा आणि तपकिरी असतो. त्याची त्वचा चमकदार असते. तोंडापासून काही अंतरावर पांढऱ्या डागासह शरीरावर दोन पांढरे पट्टे दिसतात. त्याचे डोळे मोठे आणि गोलाकार असतात. हे साप रात्री आणि पावसाळ्याच्या दिवसात जास्त चावतात.
  3. विषारी सापांचे डोके त्रिकोणी आकाराचे असते. काही विषारी सापाच्या डोक्यावर छिद्र असते. ते छिद्र एखाद्या खड्याप्रमाणे दिसते. त्यांच्या तोंडाजवळ दोन खड्डे असतात. त्या माध्यमातून ते शिकारीची शोध घेतात.
  4. ज्या सापाची शेपटी पातळ असेल तो साप जास्त विषारी असू शकतो. जाड आणि गोल शेपटी असलेले बहुतेक साप सामान्य असतात.