GK : ना लांब केस, ना चालतो टॅटू .. भारतीय सैन्यात दोन्हींवर बंदी का ? हे कारण ऐकून…

Indian Army Rules : भारतीय सैन्यात अनेक नियम कठोरपणे पाळले जातात.तिथे अंगावरील टॅटू आणि लांब केस यांनाही बंदी असते. पण ही बंदी का असते, आणि यातून कोणा-कोणाला सूट मिळते माहीत्ये का ? चला जाणून घेऊया..

GK :  ना लांब केस, ना चालतो टॅटू .. भारतीय सैन्यात दोन्हींवर बंदी का ? हे कारण ऐकून...
Indian Army
| Updated on: Dec 26, 2025 | 12:36 PM

Indian Army Rules : भारतीय सैन्याबद्दल देशातील प्रत्येक व्यक्तीला आदर असतोच, पण इथल्या कडक नियमांमबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्यासंदर्बात सर्वात जास्त विचारला जाणारा एक प्रश्न हा टॅटू आणि लांब केसांबद्दल असलेल्या बंदीबद्दल असतो. हा नियम फॅशन किंवा वैयक्तिक आवडींबद्दल नाही, तर शिस्त, आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दल आहे. असं का असंत, त्याचं कारण काय त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भारतीय सैन्यात टॅटूवर बंदी का ?

सैन्यात टॅटूवर बंदी घालण्यामागील मुख्य कारण म्हणजे आरोग्य सुरक्षा. लष्कराचं असं मानणं आहे की, हे टॅटू योग्यरित्या निर्जंतुक केलेल्या सुयांचा वापर करून काढले नाहीत तर सैनिकांना एचआयव्ही, हिपॅटायटीस आणि त्वचेचे संक्रमण यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. बहुतांश वेळा सैनिकांना यअतिशय हलाखीच्या, कठोर वातावरणात काम करावं लागतं, मात्र तिथे वैद्यकीय सुविधा मर्यादित असू शकतात, त्यामुळे किरकोळ संसर्ग देखील गंभीर ऑपरेशनल धोका निर्माण करू शकतो.

आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे शिस्त आणि एकरूपता. लष्कर हे वैयक्तिक ओळखीपेक्षा सामूहिक ओळखीवर जास्त भर देते. मोठे किंवा दृश्यमान टॅटू हे वैयक्तिक ओळखीचे लक्षण असू शकतात. पण सैन्यातील जवानांना दृश्यमान वैयक्तिक खुणा असलेल्या व्यक्ती म्हणून नव्हे तर एक युनिट म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पण हा नियम पूर्णपणे कठोर नाही आणि त्यात काही मर्यादित सूट आहेत. हाताच्या मागील बाजूस, कोपरापासून मनगटापर्यंत धार्मिक चिन्हे किंवा नावांचे छोटे टॅटू काढण्याची परवानगी असते. याशिवाय, आदिवासी समुदायातील उमेदवारांना त्यांच्या पारंपारिक पद्धतींनुसार अतिरिक्त सूट दिली जाऊ शकते.

लांब केस ठेवण्याची परवानगी का नाही ?

लांब केसांवर बंदी घालण्याचे मुख्य कारण म्हणजे युद्धाची तयारी. युद्धात सैनिकांनी हेल्मेट, गॅस मास्क आणि इतर संरक्षक उपकरणे घालणे आवश्यक असतं. लांब केसांमुळे या उपकरणांच्या योग्य सीलिंग आणि फिटिंगमध्ये अडथळा येऊ शकतो. लढाईदरम्यान लांब केस हे देखील धोका निर्माण करू शकतात. लांब केसांना पकडून शत्रू सैनिकावर सहज मात करू शकतो.

कोणाला मिळते सूट ?

हे नियम असले तरीही सैन्य हे धार्मिक आणि ऑपरेशनल आवश्यकतांचा विचार करते. शिखांना त्यांच्या धर्माचा भाग म्हणून लांब केस आणि दाढी ठेवण्याची पूर्णपणे परवानगी आहे. खरं तर, हे शीख धर्माच्या पाच ‘क’ अंतर्गत येतात. काही प्रकरणांमध्ये, विशेष दलाच्या जवानांना लांब केस आणि दाढी वाढवणे देखील आवश्यक असते. हे सहसा गुप्त किंवा अंडरकव्हर मिशनमध्ये लपण्यासाठी आणि ओळख लपवण्यासाठी वापरलं जातं.