Khopoli Crime : नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या रंगाच्या कारमधून उतरले अन्… खोपीलीमध्ये एकच खळबळ
खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळेखेंचे पती मंगेश काळेखे यांची सकाळी मुलाला शाळेतून घरी परत आणताना हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर काळ्या रंगाच्या गाडीतून येऊन पसार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली आहे का, याचा तपास करत आहेत.
खोपोली शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळेखेंचे पती मंगेश काळेखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मुलाला शाळेतून घरी परत आणत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. ही घटना सकाळी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळेखे मुलाला शाळेत सोडून परत येत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, निवडणुकीतील राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा का, या दिशेनेही तपास केला जात आहे. खोपोली नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर मानसी काळेखे नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य

