
आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. आपला मुलगा / मुलगी चांगल्या विद्यापीठ शिकला पाहिजे असं प्रत्येक आई – वडिलांतं स्वप्न असतं… भारतात अनेक प्रसिद्ध विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमधून पदवीधर झालेल्या काही विद्यार्थ्यांना भारतात आणि परदेशात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. उच्च शिक्षण झाल्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी निश्चित लागते… तर भारतात देखील असं विद्यापीठ आहे जेथे अनेक श्रीमंक लोक घडली आहेत.
भारतात एक विद्यापीठ असंही आहे जिथे पदवीधर भरपूर पैसे कमवतात. येथून पदवीधर झालेले बहुतेक अब्जाधीश होतात. या विद्यापीठाचे नाव जाणून घेण्यास तुम्हाला खूप उत्सुकता असेल. भारतात आणि जगात अशी अनेक विद्यापीठे आहेत ज्यातून अनेक अब्जाधीश उदयास आले आहेत.
भारतात, मुंबई विद्यापीठ हे असं एक विद्यापीठ आहे जिथे पदवीधर अब्जाधीश बनतात. एका रिपोर्टनुसार, मुंबई विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे जिथे शिक्षण घेतल्यानंतर तेथील विद्यार्थी अब्जाधीश बनतात.मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. 18 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांनी त्याची स्थापना केली.
जुने असूनही, ते भारतातील सर्वात प्रगत विद्यापीठांपैकी एक आहे. जेव्हा मुंबई शहराचं नाव बदलण्यात आले, तेव्हा 4 सप्टेंबर 1996 रोजी विद्यापीठाचे अधिकृतपणे मुंबई विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. मुंबई विद्यापीठ कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रम देते.
तुम्ही बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम, एमएड, एमटेक आणि एलएलएम सारख्या विषयांमध्ये शिक्षण घेऊ शकता. मुंबई विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी, उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करावा. तुमचा अभ्यासक्रम निवडा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा.
मुंबई विद्यापीठाबद्दल सांगायचं झालं तर, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होण्याचा मान महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक यांनी पटकावला.
(टीप: येथे दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे.)