जगभर प्रसिद्ध असणारा भारतातला पूल, अजूनही उदघाटन झालेलं नाही, काय आहे यामागची कहाणी, वाचा

| Updated on: Feb 24, 2023 | 6:02 PM

असाच एक पूल आपल्या भारत देशातही आहे. हा पूल देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या जगप्रसिद्ध पुलाचे उद्घाटन आजतागायत झालेले नाही. या पुलाशी निगडीत अनेक रंजक गोष्टी आहेत.

जगभर प्रसिद्ध असणारा भारतातला पूल, अजूनही उदघाटन झालेलं नाही, काय आहे यामागची कहाणी, वाचा
kolkata howrah bridge
Image Credit source: Social Media
Follow us on

भारतात आणि जगभरातील देशांमध्ये अनेक पूल असले तरी यातील अनेक पूल असे आहेत की त्यांच्या खास गोष्टीमुळे त्यांची जगभरात वेगळी ओळख आहे. अनेक पुलांना आपल्या देशाची शानही म्हटले जाते. असाच एक पूल आपल्या भारत देशातही आहे. हा पूल देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या जगप्रसिद्ध पुलाचे उद्घाटन आजतागायत झालेले नाही. या पुलाशी निगडीत अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्या आज आम्ही तुम्हाला या सांगणार आहोत…

कोलकात्याच्या हावडा ब्रिजबद्दल बोलायचं झालं तर हा पूल नेहमीच कोलकात्याची ओळख राहिला आहे. हावडा पूल बांधून जवळपास 80 वर्षे झाली आहेत. पण, आजही तो तसाच उभा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही डिसेंबर 1942 मध्ये या पुलापासून काही अंतरावर जपानी बॉम्ब पडला होता, पण तेव्हाही हा बॉम्ब पुलाचं काहीही बिघडवू शकला नाही.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात ब्रिटिश भारत सरकारने कोलकाता आणि हावडा दरम्यान वाहणाऱ्या हुगळी नदीवर हा तरंगता पूल बांधण्याची योजना आखली. खरं तर त्या काळी हुगळी नदीत रोज अनेक जहाजं ये-जा करत असत आणि खांब असलेल्या पुलामुळे या जहाजांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणून 1871 मध्ये हावडा ब्रिज ॲक्ट संमत करण्यात आला.

हावडा ब्रिजचे बांधकाम 1936 मध्ये सुरू झाले आणि 1942 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर ३ फेब्रुवारी 1943 रोजी सर्वसामान्यांनी त्याचा वापर सुरू केला. त्यावेळी हा जगातील तिसरा सर्वात लांब पूल होता. कवी गुरू रवींद्रनाथ यांच्या नावावरून 1965 साली त्याचे नाव रवींद्र सेतू ठेवण्यात आले.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हावडा ब्रिजच्या उभारणीसाठी 26,500 टन स्टीलचा वापर करण्यात आला होता, त्यापैकी 23,500 टन स्टीलचा पुरवठा टाटा स्टीलने केला होता. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण पूल नदीच्या दोन्ही बाजूला 280 फूट उंचीच्या दोनच खांबांवर उभा आहे. या दोन खांबांमधील अंतर दीड हजार फूट आहे. याशिवाय पुलाला आधार देण्यासाठी नदीत कोठेही खांब नाही.