AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Country on Rent: अख्खा देश मिळतो किरायाने… इतके एका रात्रीचे भाडे… लोकसंख्या तरी किती?

Country on Rent: घर, फ्लॅट, कार अथवा इतर गोष्टी तुम्ही भाड्याने, किरायाने घेतल्या असतील. पण कधी एखादा देश भाडेतत्त्वावर मिळतो असे कधी तुम्ही ऐकले का? अर्थात आता हा देश भाड्याने मिळत नाही. पण काही वर्षांपूर्वी ही प्रथा होती. कोणता आहे हा देश?

Country on Rent: अख्खा देश मिळतो किरायाने... इतके एका रात्रीचे भाडे... लोकसंख्या तरी किती?
अख्खा देश भाडेतत्वावरImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 30, 2026 | 3:22 PM
Share

Country on Rent: भाडेतत्त्वावर घर, फ्लॅट, कार इतकेच काय तर फ्रिजही मिळतो. काही देशात तर प्रियकर आणि प्रेयसीच काय काही दिवसांसाठी बायको सुद्धा भाडे तत्वावर मिळत असल्याच्या मॅसेजने तुमचे सोशल मीडियावर मनोरंजन केले असेलच. पण संपूर्ण देश भाड्याने देणे आहे असा बोर्ड तुम्ही कधी कुठं पाहिला का? पण हा छोटा देश थेट किरायाने देण्यात येत असे. या देशाची लोकसंख्या सुद्धा एक लाखांच्या घरात आहे. पण आता हा देश भाड्याने अथवा किरायाने देण्यात येत नाही. ही सेवा 16 वर्षांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. हा देश युरोपात आहे. लिकटेनस्टाईन (Liechtenstein) असे या देशाचे नाव आहे. तो स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया या दोन देशांच्या दरम्यान आहे. हा देश दिल्ली आणि मुंबईपेक्षा या महानगरापेक्षाही छोटा आहे.

किती रुपयात या देशाचं बुकिंग?

हा छोटा श्रीमंत देश आहे. हा देश भाड्यावर देण्याची संकल्पना जगाला बुचकाळ्यात टाकणारी होती. पण जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली होती. या देशाने ही अनोखी मार्केटिंग मोहिम सुरू केली होती. त्यातंर्गत कोणीही, कोणतीही संस्था या देशात दोन रात्रीचा प्रवासासह थांबू शकत होता. त्यासाठी 70000 अमेरिकन डॉलर प्रति रात्र भाडे म्हणजे 60 लाख रुपये देऊन राहू शकत होती. या ऑफरमध्ये या व्यक्तीसोबत 900 पाहुणे, त्याचे जेवण, राहण्याची आणि पर्यटनाची सोय करण्यात आली होती. येथील 500 अधिक बेडरूम, बाथरुम तसेच रस्त्याला त्याचे नाव देण्याची संकल्पनाही त्यात होती. इतकेच नाही देश भाड्यावर घेतल्यावर त्या व्यक्तीच्या नावाचे चलनही दोन ते तीन दिवसांसाठी सुरू करता येत होते. तर येथील राजकुमारासोबत वाईनचा अस्वादही घेता येत होता.

जगाच्या नाकाशावर येण्यासाठी अनोखी योजना

जगाच्या नकाशावर ठळकपणे समोर यावे यासाठी येथील सरकारने ही योजना आखली होती. लिकटेनस्टाईन हा एक छोटा देश आहे. पण त्याचा इतिहास जुना आहे. इथं निसर्गाने मुक्त हस्तानं उधळण केली आहे. येथील एका उंच टेकडीवर एक किल्ला आहे. तिथे राजा राहतो. येथे त्याचे अधिकृत निवासस्थान आहे. इथं अंगुराचे बगीचे आहेत. येथील वाईन उच्च दर्जाची मानली जाते. पर्यटनातून गंगाजळी भरण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती. पण नंतर 2011 मध्ये देश भाडेतत्वावर देण्याची ही योजना बंद करण्यात आली.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल