झुरळांची नवी प्रजाती, नाव ठेवलं पोकेमॉन! असं नाव ठेवण्यामागे कारण काय?

| Updated on: Mar 11, 2023 | 5:21 PM

कीटक शास्त्राच्या टीमने झुरळांचा एक नवीन प्रकार शोधून काढलाय. या फेरोमोसा (Phermosa) प्रजातीचे नाव पोकेमॉनच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, जे झुरळांसारखे दिसते आणि पहिल्यांदा ते व्हिडिओ गेम मालिकेच्या सातव्या भागात दिसले.

झुरळांची नवी प्रजाती, नाव ठेवलं पोकेमॉन! असं नाव ठेवण्यामागे कारण काय?
cockroach pokemon phermosa
Image Credit source: Social Media
Follow us on

अशा अनेक कीटक आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत ज्यांचा अद्याप तज्ञांनी शोध लावलेला नाही. हा शोध सुरूच असून शास्त्रज्ञांनी मोठी प्रगती केली आहे. उदाहरणार्थ, सिंगापूरच्या कीटक शास्त्राच्या टीमने झुरळांचा एक नवीन प्रकार शोधून काढलाय. या फेरोमोसा (Phermosa) प्रजातीचे नाव पोकेमॉनच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, जे झुरळांसारखे दिसते आणि पहिल्यांदा ते व्हिडिओ गेम मालिकेच्या सातव्या भागात दिसले.

सिंगापूरमध्ये सापडली झुरळांची नवी प्रजाती

अनेक वर्षांच्या सखोल अभ्यासानंतर ली काँग चियान नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील कीटकशास्त्रज्ञ फू माओशेंग आणि यूपीएलबी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे ख्रिश्चन लुकानास यांनी हा शोध लावला. डॉ. माओशेंग यांनी खुलासा केला की त्यांनी आपल्या या शोधाला पोकेमॉनचे नाव दिले कारण ते ॲनिमी मालिकेचे खूप मोठे चाहते आहेत.

पोस्ट पाहिल्यानंतर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. कुणी या नावाचा निषेध केला तर कुणी कौतुक. पोकेमॉनच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समधील या शोधाचे कौतुक केले.