
नवी दिल्ली : देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या मधुमेहावर उपाययोजना वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात. मधुमेह झालेल्यांना इंसुलीनची गरज पडते. बरेच रुग्ण इंसुलीनचे इंजेक्शन घेऊन यावर नियंत्रण ठेवतात. आता यासंदर्भात नवीन उपचार पद्धती विकसित झाली आहे. मानसाच्या डीएनएला विजेने नियंत्रित केले जाणार आहे. याचा फायदा मधुमेहाच्या रुग्णांना होईल. १० सेकंदाच्या आत शरीरात इंसुलीन तयार केले जाईल. स्वीत्झर्लंडच्या शास्त्रज्ञांनी असा अनोखा प्रयोग केला आहे. या प्रयोगाचा भविष्यात फायदा होणार आहे. विजेचा वापर करून जीन्सला चालू, बंद करता येऊ शकते, असं या शास्त्रज्ञांचं म्हणणंय. भविष्यात अनेक फायदे होतील. अॅक्युपंचरमध्ये वापरली जाणार सूई यात वापरली जाते. शास्त्रज्ञांनी या प्रयोगाला जीन्स थेरपी असं नाव दिलं आहे. जाणून घेऊया ही थेरपी आणि याचा मानवाला कसा फायदा होईल ते…
शास्त्रज्ञ म्हणतात आम्ही जीन्स थेरपी विकसित केली आहे. इंसुलीन तयार करणाऱ्या जीन्सला अॅक्टिव्ह केले जाऊ शकते. ही थेरपी विकसित होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला. शरीरात वापरावयाच्या वस्तूंवर याचे प्रयोग करण्यात आले. स्मार्टवॉचचाही वापर करण्यात आला. या पद्धतीत व्यक्तीचे जीवनमान बदलता येते. इलेक्ट्रॉनिक्स आणि शारीरिक गाईडलाईनकडे विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे.
शास्त्रज्ञांनी या प्रयोगासाठी मानवाला ४.५ होल्टचा झटका दिला. यातून इंसुलीनची निर्मिती होते आणि ब्लड शुगर व्यवस्थित राहते, असं शास्त्रज्ञांचं म्हणण आहे. डार्ट सिस्टीमने चालणाऱ्या बॅटरीने दहा सेकंट झटका दिला जातो.
डार्ट सिस्टीम इंसुलीनच्या निर्मितीसाठी जीन्सला अॅक्टिव्ह करत असल्याचं शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मानसाचे जीन्स ऑन आणि ऑफ करण्यात यश मिळाल्याचं स्वीत्झर्लंडच्या शास्त्रज्ञांचं म्हणणे आहे. या माध्यमातून दहा मिनिटांत इंसुलीनची निर्मिती होईल. याचा फायदा मधुमेही रुग्णांना होणार आहेत. देशातीलच नव्हे तर जगातील रुग्णांसाठी दिलासा देणारी अशी ही बातमी आहे.