AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026 : मुंबईतल्या या जागांवरुन भाजप-एकनाथ शिंदे शिवसेनेत एकमत नाही

BMC Election 2026 : मागच्या दोन-तीन वर्षांपासून मतदार आणि राजकीय पक्षांना ज्या निवडणुकीची प्रतिक्षा होती, ती जाहीर झालीय. मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. येत्या 15 जानेवारी मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक देशात प्रतिष्ठेची मानली जाते.

BMC Election 2026 : मुंबईतल्या या जागांवरुन भाजप-एकनाथ शिंदे शिवसेनेत एकमत नाही
Eknath Shinde-Devendra Fadnavis
| Edited By: | Updated on: Dec 17, 2025 | 1:13 PM
Share

एकवेळ मुंबई हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला होता. पण 2022 साली राज्यातलं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांची शक्ती कमी व्हायला सुरुवात झाली. मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीला तर ठाकरे गटाला फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागेल. भाजपने मुंबईतील त्यांची ताकद कायम राखली. तर शिंदे गटाने सुद्धा विधानसभेच्या काही जागा जिंकून मुंबईत प्रवेश केला. उद्धव ठाकरे आणि मनसे यांचा जनाधार घटला. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची आहे, तर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई जिंकून ठाकरेंच अजून खच्चीकरण त्यांच्या राजकारणासाठी आवश्यक आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात काल भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक झाली. यावेळी काही जागांवरुन दोन्ही पक्षांमध्ये पेच आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मुंबईतील लालबाग, परेल, दादर, माहीम, भायखळा आणि कुलाबा या पारंपरिक व राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रभागांतील जागांवर पेच आहे. दोन्ही पक्षांनी इथल्या जागांवर दावा केलाय अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या काळातील माजी नगरसेवक ज्या प्रभागांतून निवडून आले होते, त्या जागांवर ठामपणे आग्रही. या भागांमध्ये शिवसेनेची पारंपरिक ताकद राहिल्याचा शिवसेनेचा दावा आहे.

भाजपा या जागांवर का दावा करतय?

संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक संपर्काच्या जोरावर त्या जागा आपल्यालाच मिळायला हव्यात, अशी भूमिका शिंदे गटाने मांडल्याची माहीती.दुसरीकडे, भाजपही मुंबई शहरातील याच महत्त्वाच्या जागांवर हिंदुत्ववादी मतांच्या जोरावर हक्क सांगत आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील मतदारसंघांत भाजपची ताकद वाढली असून, शहरी मतदार, व्यापारी वर्ग आणि मध्यमवर्गीय भागांमध्ये भाजपचा प्रभाव वाढल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत या पेचावर प्राथमिक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला, स्थानिक राजकीय समीकरणे, मागील निवडणुकांचे निकाल आणि विजयाची शक्यता यांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी