AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओचे ‘या’ स्वस्त प्लॅन्समध्ये मोफत जिओहॉटस्टार आणि अमर्यादित 5G डेटाचा समावेश,अन् बरेच फायदे

तुम्ही जर जिओ वापरकर्ते असाल आणि मोफत जिओहॉटस्टार व अनलिमिटेड 5G डेटासह प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेखात या पाच सर्वोत्तम जिओ प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात.

जिओचे 'या' स्वस्त प्लॅन्समध्ये मोफत जिओहॉटस्टार आणि अमर्यादित 5G डेटाचा समावेश,अन् बरेच फायदे
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Apr 12, 2026 | 10:58 AM
Share

रिलायन्स जिओ कंपनी त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन आणि आकर्षक रिचार्ज प्लॅन्स सादर करत आहे, ज्यामध्ये अनलिमिटेड 5G डेटा आणि अनेक OTT प्लॅटफॉर्मवर मोफत प्रवेशाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या प्लॅन्समध्ये जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शनचाही समावेश आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना थेट क्रिकेट आणि मनोरंजनाचा आनंद घेता येतो. कमी किमतीत अधिक फायदे देणारे हे प्लॅन्स अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. कंपनीने वेगवेगळ्या बजेटनुसार अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. चला तर मग अशा बरेच फायदे असणाऱ्या जिओ प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयातत

500 च्या प्लॅनमध्ये संपूर्ण OTT पॅकेज

जिओचा 500 रुपयांचा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना मनोरंजन आणि डेटा दोन्ही हवे आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा, म्हणजेच एकूण 56 जीबी डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळते. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. विशेष म्हणजे यामध्ये यूट्यूब प्रीमियम, प्राईम व्हिडिओ मोबाईल आणि जिओ हॉटस्टारसह अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस मिळतो. याव्यतिरिक्त या यामध्ये जिओ एआय क्लाउडमध्ये 50 जीबी स्टोरेज आणि गूगल जेमिनीसाठी 18 महिन्यांचा प्रो प्लॅन देखील मिळतो. ज्यांना एकाच रिचार्जमध्ये अनेक सेवा हव्या आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे.

399 रूपयांच्या प्लॅनमध्ये अधिक डेटा आणि क्रिकेटची मजा

जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये अधिक डेटाचे फायदे मिळतात. यामध्ये दररोज 2.5 जीबी डेटा, म्हणजेच एकूण 70 जीबी डेटा मिळतो आणि तो 28 दिवसांसाठी वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये लाईव्ह क्रिकेट पाहण्यासाठी तीन महिन्यांचे JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देखील वापरकर्त्यांना मिळते. तसेच यामध्ये JioAICloud मध्ये 50 जीबी स्टोरेज आणि गूगल Gemini चाही समावेश आहे. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस संदेश उपलब्ध आहेत. हा प्लॅन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी योग्य आहे जे वारंवार इंटरनेट वापरतात आणि क्रिकेटचे मॅच पाहण्याचे शौकीन आहेत.

जास्त वैधतेसाठी 749 रूपयांचा प्लॅन

749 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 72 दिवसांची असून, यामध्ये एकूण 164 जीबी डेटा मिळतो. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा आणि त्यासोबत 20 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये JioHotstar चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन, तसेच JioAICloud आणि गूगल Gemini चे फायदे देखील समाविष्ट आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचाही समावेश आहे. ज्या वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज करायचा नाही आणि दीर्घकाळासाठी डेटा व मनोरंजनाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे.

949 रूपयांच्या प्लॅनमध्ये सर्वाधिक वैधता आणि 5जी डेटा

949 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि यामध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. एकूण 168 जीबी डेटासह, हा प्लॅन एक दीर्घकालीन पर्याय आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी JioHotstar चा पूर्ण ॲक्सेस मिळतो आणि JioAICloud व Google Gemini यांचाही समावेश आहे. कॉलिंग आणि एसएमएस अमर्यादित आहेत. ज्या वापरकर्त्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय दीर्घकाळ इंटरनेट आणि ओटीटी कंटेंटचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन आदर्श आहे.

79 रूपयांचा क्रिकेट डेटा पॅक

79 रुपयांचा हा छोटा प्लॅन खास क्रिकेट चाहत्यांसाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 3 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. या पॅकमध्ये JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शनचाही समावेश आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना थेट सामने पाहता येतात. मात्र, हा केवळ डेटा प्लॅन असल्याने यामध्ये कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा मिळत नाही. या कमी किमतीमुळे ज्यांना फक्त क्रिकेट पाहण्यासाठी अतिरिक्त डेटाची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी हा प्लॅन उपयुक्त ठरतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...