UPSC Interview Questions : मी तुमच्या बहिणीसोबत पळून गेलो तर काय कराल?, उमेदवाराने दिलं भन्नाट उत्तर; तुम्ही काय म्हटलं असतं?

UPSC उत्तीर्ण होण्यासाठी पूर्व आणि मुख्य विषयाची तयारी जितकी महत्वाची असते तितकेच मुलाखतीची तयारी करणेही महत्त्वाची आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी मुलाखतीत अनुत्तीर्ण होतात.

UPSC Interview Questions : मी तुमच्या बहिणीसोबत पळून गेलो तर काय कराल?, उमेदवाराने दिलं भन्नाट उत्तर; तुम्ही काय म्हटलं असतं?
Image Credit source: social
| Updated on: Feb 14, 2025 | 1:17 PM

जवळजवळ प्रत्येक नोकरीसाठी मुलाखत देणं आवश्यत असतं. पण सरकारी नोकरीसाठीची मुलाखत इतर नोकऱ्यांपेक्षा खूपच अवघड असते, विशेषत: UPSCची मुलाखत. UPSC नागरी सेवा परीक्षेची मुलाखत ही देशातील सर्वात कठीण मुलाखत मानली जाते. प्रिलिम आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दरवर्षी अनेक विद्यार्थी मुलाखतीत नापास होतात. UPSC उत्तीर्ण होण्यासाठी पूर्व आणि मुख्य विषयाची तयारी करणे महत्वाचे आहे, तसेच मुलाखतीची तयारी करणेही तितकेच महत्वाचे आहे. मुलाखतीची चांगली तयारी केल्याशिवाय तुम्ही परीक्षेत पास होऊ शकत नाही. जर कोणी लेखी परीक्षेत पास झाला तरी तो मुलाखतीदरम्यान ‘पर्सनॅलिटी टेस्ट’मध्ये अडकतो. या ‘पर्सनॅलिटी टेस्ट’मध्ये अनेक वेळा अतिशय विचित्र प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरे देणे कठीण जाते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असे प्रश्न घेऊन आलो आहोत, जे मुलाखतीत विचारले जाऊ शकतात. यातील काही प्रश्न सामान्य ज्ञानाचे आहेत तर काही विचित्र प्रश्न आहेत जे तुमच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी विचारले जातात. काय आहेत ते प्रश्न, चला जाणून घेऊया..

1. मी तुमच्या बहिणीसोबत पळून गेलो तर काय कराल?

उत्तर : सर! मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याहून अधिक योग्य जोडीदार मिळणारच नाही.
(स्पष्टीकरण: या उत्तराचा उद्देश केवळ विनोदबुद्धी असणे नाही तर उमेदवारांची सकारात्मक मानसिकता प्रतिबिंबित करणे देखील आहे.)

2. महेश आणि सुरेश या जुळ्या भावांचा जन्म मे महिन्यात झाला होता, पण त्यांचे कुटुंब त्यांचा वाढदिवस जूनमध्ये साजरा करतात. असे का?

उत्तर: कारण त्या दोघांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाचे नाव मे आहे.

3. काँक्रीटच्या फरशीवर कच्चे अंडे तुटल्याशिवाय कसे टाकायचे?

उत्तर: काँक्रीटची फरशी खूप मजबूत असते, ती तुटणार नाही.

4. जर 2 कंपनी असेल आणि 3 गर्दी असेल तर 4 आणि 5 किती होतील ?

उत्तर: 9 होतील.

5. एका मांजरीला जानेवारी, मार्च आणि मे अशी तीन पिल्ले होती. What was the mother’s name?

उत्तर: आईचं नावं ‘What’ होतं ,

6. मोर अंडी देत नाही, मग मुलांना कसा जन्म देतो ?

उत्तर: अंडी मोर नव्हे लांडोर देते .

7. जेम्स बॉन्ड के पास पैराशूट नहीं है। उसे ऐरोप्लेन से धकेल दिया जाता है। फिर भी वह बच जाता है। कैसे?

उत्तर: क्योंकि प्लेन रनवे पर ही खड़ा था।

8. न झोपता एखादा माणूस 8 दिवस कसा राहील ?

उत्तर: रात्री झोपून ।

9. नाग पंचमी च्या विरुद्ध काय असतं ?

उत्तर: नाग डिड नॉट पंच मी.

10. बुधवार, शुक्रवार आणि रविवार याचा वापर न करता 3 सलग दिवसांची नावे सांगा

उत्तर: काल, आज आणि उद्या

11. फक्त 2 चा वापर करून 23 कसं लिहाल ?

उत्तर: 22+2/2