World First City: जगातील पहिले शहर कोणते होते? आता कसं दिसतं ते नगर?

World First City: जगातील पहिले शहर कोणते होते? तुम्हाला माहिती आहे का? अनेकांना वाटेल की सिंधू संस्कृती मोहनजोदडोमध्ये हे शहर असेल तर तुमचा हा अंदाज साफ चुकला आहे. हे शहर या देशात होते.

World First City: जगातील पहिले शहर कोणते होते? आता कसं दिसतं ते नगर?
जगातील पहिलं शहर
| Updated on: Dec 07, 2025 | 4:18 PM

World First City: आज जेव्हा आपण नागरी संस्कृतीचा, आपल्या समृद्ध वारशाचा विचार करतो तेव्हा आपल्याला हडप्पा, मोहनजोदोडो हा वारसा आठवतो. काहींना रामायण, महाभारत काळ, कुणाला कुषाण, हून, मौर्य अथवा दक्षिणेत चालुक्य, वाकाटक, सातवाहन आणि इतर सोनेरी इतिहास आठवतो. पण जगातील सर्वात विकसीत पहिले शहर कोणते होते असा प्रश्न जेव्हा येतो. तेव्हा त्याचे उत्तर हे इतर देशात शोधावं लागतं. तर जगातील पहिले शहर हे भारत, चीनमध्ये नाही तर इराकमध्ये वसलेले होते. ईसवी सन 4,000 वर्षांपूर्वी उरूक (Uruk Iran) हे शहर वसलं होतं. हे शहर वास्तुकलेचे एक उत्तम नमुना होतं. हे शहर नियोजनपूर्वक वसवलेले होतं. इथं सांडपाण्यापासून ते इतर अनेक सोयी-सुविधा होत्या. येथील लोक साहित्य आणि इतर प्रांतात चांगले पुढारलेले होते.

नागरिकतेचे पहिले प्रमाण

उरूक हे शहर युफ्रेटस नदीच्या किनाऱ्यावर वसलेले होते. येथे शेतीसाठी उपयुक्त जमीन, व्यापार आणि समृद्धी होती. येथील लोकसंख्या पण अधिक होती. या शहरात त्यावेळी, 4,000 ईसवी सन पूर्व, 60 हजार नागरी राहत होते. या ठिकाणी झपाट्याने शहरीकरण झाले होते. ऊरक ही मोठी मानवी वसाहत होती.

 शहरी सभ्यतेच्या पाऊलखुणा

उरूक हे त्याकाळचे प्रगत शहर होते. येथील लोकांनी लेखन कला आत्मसात केली होती. व्यापार आणि प्रशासकीय नोंदी ठेवण्यात येत होत्या. त्याचे जतन करण्यात येत होते. म्हणजे येथील शहरवासीय हे साक्षर असल्याचे प्रमाण मिळते. येथे साहित्य निर्मितीही झाल्याचे काही पुराव्यावरून समोर येते. आर्थिक सत्ता केंद्रासोबत येथे कला, संस्कृती आणि लिखाणाला मोठा वाव मिळत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

उरुक हे प्राचीन मेसोपोटामिया संस्कृतीतील प्राचीन वारसा जपणारं शहर होतं. येथे पिरॅमिड्सच्या आकाराची मोठी मंदिरं होती. ही मंदिरं प्रेम आणि युद्धाची देवी इनन्ना हिच्या आठवणीत तयार करण्यात आली होती. तिची या मंदिरात पूजा अर्चा होत असे. अनेक ठिकाणी मोठे वट्टे, सभामंडप दिसून येतात. त्याअर्थी येथे कलेचे सादरीकरण होत असावे.

दक्षिण इराकमधील उरुक आता भग्नावस्थेत आहे. येथे मंदिर, आणि घरांची भग्नावेश दिसतात. हा भाग आता उदासीन झाला आहे. कधीकाळी येथे एक सभ्यता नांदत होती. पण इराक आणि इराणमध्ये नंतर इतक्या वर्षात अनेक बदल होत गेले आणि हे शहर भग्न झालं. येथे संशोधकाशिवाय फारसं कुणी फिरकतही नाही. संशोधकांची पालं मात्र इथं कायम आहेत.