Kuwaiti Dinar: कुवेतमध्ये 10,000 डॉलर्सची किंमत किती? मुस्लिम देशाच्या चलनाची मोठी टशन
Kuwait Dinar: जर तुम्ही कुवेतमध्ये 10,000 डॉलर्स घेऊन गेले. तर तिथे चलन विनिमयात मोठा फरक दिसेल. एक्सचेंज दरानुसार हा भाव किती असेल, तुम्हाला माहिती आहे का?

Kuwaiti Dinar: जर तुम्ही कुवेतमध्ये 10,000 डॉलर्स घेऊन आलात तर कुवेतमध्ये त्याचे चलन विनियम दर खूप मोठा असेल. एक्सचेंज रेटनुसार, त्याचे जवळपास 3070 कुवेती दिनार मूल्य होईल. कुवेती दिनार हे अत्यंत मजबूत चलन आहे. हे चलन मजबूत होण्यामागे अनेक कारणं आहेत. कुवेतचे दिनार हे अनेक दशकांपासून सर्वाधिक मूल्य असलेले चलन आहे. भारताचे 90 रुपये एक डॉलरच्या बरोबरीत झाले आहे. तर एक कुवेती दिनार हा जवळपास 3.26 अमेरिकी डॉलरच्या समान आहे. आर्थिक स्थिरता, मोठे इंधन भांडार आणि आर्थिक शिस्त आणि धोरणं यामुळे या देशांचे चलन मजबूत आहे.
इंधनावर अर्थव्यवस्थेची भरारी
कुवेतची अर्थव्यवस्था कच्चा तेलाच्या भांडारावर टिकलेली आहे. हा व्यवसाय राष्ट्राला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देतो. या देशात कमी लोकसंख्या आणि प्रति व्यक्ती अधिक उत्पन्न यामुळे देश मजबूत आर्थिक स्थितीत आहे. कुवेत मध्ये टॅक्स फ्री अर्थव्यवस्थेचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. अगदी काही कर आकारले जातात. कमाईचा मोठा भाग हा लोकांकडेच राहतो.
दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कुवेतची हटके मॉनेटरी स्ट्रॅटेजी. या देशाने त्यांचे चलन केवळ अमेरिकन डॉलरवर आधारभूत केलेले नाही. दिनार हे जागतिक चलन म्हणून मान्यता प्राप्त आहे. ते इतर चलनाशी विनिमय करण्यास जोडते. त्यामुळे त्याच्यावर थेट जागतिक अस्थिरतेचा कोणताही परिणाम होत नाही.
भारतीय रुपयांचा व्हायचा अगोदर वापर
कुवेत दिनार हे 1000 फिलमध्ये विभागले जाते. ते रोजच्या व्यवहारात वापरले जाते. कुवेत दिनार हे एक ते 100 फिलपर्यंत असते. यासह बँक नोट 1, 5, 10 आणि 20 दिनारमध्ये असतात. एक विशेष बाब म्हणजे 1961 पूर्वी कुवेत त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी भारतीय रुपयांचा वापर करत होता.
पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाने आर्थिक स्थैर्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी दिनार या चलनाचा वापर सुरू केला. कच्चा तेला आधारीत अर्थकारणामुळे हा देश मोठ्या उंचीवर जाऊन पोहचला. आता पर्यटनासह इतर अनेक क्षेत्रात हा देश प्रगती करत आहे. पर्यटकांना हा देश तसा स्वस्तात फिरता येतो. कारण डॉलरच्या तुलनेत येथील चलन जरी मजबूत असले तरी देशातंर्गत अनेक वस्तू या कराची मोठी झंझट नसल्याने स्वस्तात मिळतात.
