AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Press | इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा

Sanjay Raut Press | इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा

| Updated on: Mar 15, 2026 | 12:05 PM
Share

राज्यात इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. देशात पेट्रोल, डिझेल आणि LPG चा कोणताही तुटवडा नसून काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. देशात पेट्रोल, डिझेल आणि LPG चा कोणताही तुटवडा नसून काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची बदनामी करणे थांबवावे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे समर्थन करू नये, असे राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना देशातील वाढती महागाई, इंधन टंचाई आणि त्याचा देवस्थानांमधील प्रसादावर होणारा परिणाम यावरही भाष्य केले. देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली मानहानी यासाठी मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संघर्ष थांबवण्याची क्षमता असती, तर इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षात इतक्या लोकांचे प्राण गेले नसते, अशी टीकाही त्यांनी केली. या दोन देशांतील संघर्षासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही जबाबदार ठरवत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

Published on: Mar 15, 2026 12:05 PM
Follow Us