जिथून तुम्ही भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकता, सर्वात मोठं रेल्वे जंक्शन!

भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात जाण्यासाठी तुम्ही या जंक्शनवरून ट्रेन पकडू शकता. हे जंक्शन कुठे आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेऊया.

जिथून तुम्ही भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकता, सर्वात मोठं रेल्वे जंक्शन!
Biggest railway junction
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 18, 2023 | 1:48 PM

भारतीय रेल्वे जगातील 5 सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. यात अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी तुम्हाला त्यांच्याबद्दल जितकी जास्त माहिती असेल तितका तुम्हाला अभिमान वाटेल. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे जंक्शनबद्दल सांगणार आहोत, जे कधीच रिकामे नसते. इथे चोवीस तास गाड्यांची वर्दळ असते. भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात जाण्यासाठी तुम्ही या जंक्शनवरून ट्रेन पकडू शकता. हे जंक्शन कुठे आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेऊया.

मथुरा रेल्वे जंक्शन

हे देशातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे, मथुरा जंक्शन यूपीच्या मथुरा जिल्ह्यात बांधलेले आहे. हे जंक्शन उत्तर मध्य रेल्वेअंतर्गत येते. या जंक्शनवरून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेकडे 7 वेगवेगळ्या मार्गांच्या गाड्या जातात. या स्थानकावर एकूण 10 प्लॅटफॉर्म असून, त्यावर नेहमीच रेल्वेची वर्दळ असते.

तुम्ही या जंक्शनवर केव्हाही यावं. या रेल्वे जंक्शन वरून रात्रंदिवस गाड्या जातात. इथून नेहमी शेकडो गाड्या जाताना दिसतील. देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाण्यासाठी तुम्ही इथून ट्रेन पकडू शकता. या जंक्शनवर पहिली रेल्वे 1875 मध्ये धावली होती. त्यानंतर 1889 साली मथुरा-वृंदावन दरम्यान 11 किमी लांबीची मीटरगेज लाइन सुरू करण्यात आली.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जंक्शन देशातील सर्वाधिक बुकिंग असलेल्या 100 रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. एवढी कामगिरी करूनही जंक्शनवरील स्वच्छतेचा अभाव ही रेल्वेसाठी मोठी समस्या आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (QCI) २०१८ च्या अहवालानुसार, सर्वेक्षण केलेल्या 75 प्रमुख स्थानकांमध्ये हे स्थानक सर्वात कमी स्वच्छ असलेलं रेल्वे स्थानक घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून इथे स्वच्छतेसाठी सातत्याने काम केले जात आहे.