विमान उडताना आणि उतरताना विमानातील लाईट बंद का केले जातात? तुम्हाला माहिती आहे का कारण?

Fun Fact Marathi विमान प्रवास हा प्रत्त्येकालाच आवडतो. अनेकांना विमान प्रवासाबद्दल कुतूहलही असते. तुम्ही कधी विमान प्रवास केला असेल तर एक गोष्ट नक्कीच अनुभवली असेल ती म्हणजे विमान उडण्याआधी आणि उतरण्याच्या काही वेळ आधी विमानातील दिवे विझवले जातात. त्याबद्दलची सुचना देखील हवाई सुंदरीकडून देण्यात येते. मात्र असं करण्यामागचे कारण तुम्हाला माहिती आहे का?

विमान उडताना आणि उतरताना विमानातील लाईट बंद का केले जातात? तुम्हाला माहिती आहे का कारण?
विमान
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 29, 2023 | 2:08 PM

मुंबई : तुमच्यापैकी अनेकांनी कधी ना कधी विमानाने प्रवास केला असेल. जरी कोणी केला नसेलही तरी, आपल्याला विमानाचे किमान काही नियम माहित असतीलच. जसे की विमानप्रवास करताना सीट बेल्ट कधी लावायचा, शौचालय कधी वापरायचे, सीटसमोरचे स्टँड कधी उघडायचे आणि कधी बंद करायचे इ. हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला अशीच एक रंजक माहिती (Fun Fact Marathi) सांगणार आहोत ज्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल. टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी विमानाच्या आतील दिवे का बंद केले जातात हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्यामागचे महत्त्वाचे कारण सांगणार आहोत.

या कारणामुळे टेक ऑफ आणि लँडिंग करण्यापूर्वी दिवे बंद केले जातात

वास्तविक, आपल्या डोळ्यांना अंधाराशी जुळवून घेण्यासाठी 10 ते 30 मिनिटे लागतात. अशा परिस्थितीत टेक-ऑफ किंवा लँडिंगदरम्यान विमानात अचानक अपघात झाला आणि विमानाचे दिवे ताबडतोब बंद झाले, तर अशा परिस्थितीत कोणत्याही प्रवाशाने घाबरून जाऊ नये, याची एअरलाइन्स काळजी घेतात. त्यामुळे टेक ऑफ किंवा लँडिंगच्या खूप आधी विमानाचे दिवे मंद होतात. बोईंग एअरलाइन्सच्या मते, 2006 ते 2017 दरम्यानचे त्यांचे अनुभव असे दर्शवतात की 13 टक्के अपघात हे टेकऑफच्या पहिल्या तीन मिनिटांत झाले आहेत आणि 48 टक्के अपघात लँडिंगच्या आठ मिनिटांपूर्वी झाले आहेत.

आपत्कालीन दिवे हे देखील एक कारण आहे

याशिवाय लँडिंग आणि टेकऑफच्या वेळी विमानाचे दिवेही बंद केले जातात, जेणेकरून प्रवाशांना फ्लाइटमध्ये लावलेले आपत्कालीन दिवे स्पष्टपणे पाहता येतील.  या आपत्कालीन दिव्यांमध्ये चमकणारे रिफ्लेक्टर असतात आणि हे दिवे प्रवाशांच्या आसनांच्या अगदी वर स्थापित केले आहेत, जे लाल आणि पिवळ्या रंगाचे असतात. हे दिवे तुम्हाला प्रत्येक क्रियेसाठी सिग्नल देण्याचे काम करतात.