भारतीय महिला बाईकवर एक बाजूनेच का बसतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही हे कारण

Why Indian Women sit sideways on Bike : भारतीय महिला बाईकवर एकाच अंगाने, एकाच बाजूने का बसतात? काय आहे त्यामागील कारणं? ही परंपरा नाही तर ब्रिटिश इतिहासाशी त्याचा संबंध आहे. काय आहे कारण?

भारतीय महिला बाईकवर एक बाजूनेच का बसतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही हे कारण
महिला बाईकवर एक बाजूनेच का बसतात? अनेकांना माहिती नाही हे कारण
| Updated on: Nov 17, 2026 | 10:00 AM

Why Indian Women sit sideways on Bike : आजही भारतीय रस्त्यावर एक चित्र सगळीकडे दिसते. महिला बाईकवर एका बाजूने, एका अंगाने बसलेल्या दिसतात. गावासह शहरात आजही महिलांना ही सवय आहे. महिला बाईकवर एका बाजूला पाय सोडून बसतात. 1980 ते 1990 या दशकात जन्मलेल्या महिला, साडी, लुगडं घातलेल्या महिला आजही एकाच अंगाने बसतात. यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही अथवा, तशी काही परंपरा सुद्धा नाही. यांचं कारण ब्रिटिश इतिहासात दडलंय असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला शिवाय राहणार नाही.

अशोभनिय वाटते म्हणून…

Loading...

तशी ही प्रथाच पडली आहे. साडी असो लहेंगा असो वा पंजाबी ड्रेसमधील महिला असो त्या बाईकवर दोन्ही पाय टाकून बसत नाही. तर एकाच बाजूने बसणे पसंत करतात. त्यामागे काही सामाजिक संकेत आहेत. आजच्या जमान्यातील मुली तशा वागत नाही. आज तर बुलेट, रॉयल एनफिल्डसारख्या दमदार बाईकही मुली सहज चालवतात. जीन्स, शॉर्ट्समध्ये त्या बाईक चालवतात. पण आजही अनेक महिला दोन्ही बाजूने पाय मोकळे सोडून बाईक चालवत नाहीत. मोठ्या आणि वयोवृद्धासमोर बाईकवर दोन्ही बाजूने पाय सोडून बसणे आजही अशोभनिय मानले जाते.

पाकिस्तानी युट्यूबरने शोधले यामागील उत्तर

पाकिस्तानची युट्यूबर झेनिथ इरफान (zenithirfan) हिने भारतीय उपखंडातील महिला बाईकवर एकांगी का बसतात याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ती कंटेंट क्रिएटर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने संपूर्ण पाकिस्तान दुचाकीवरून पालथा घातला आहे. मुलीने बाईकर व्हावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. ते स्वप्न तिने पूर्ण केले, पण ते पाहायला तिचे वडील हयात नाहीत. तिने एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात महिला एकांगी दुचाकीवर का बसतात याविषयीचा खुलासा केला. दक्षिण आशियात खास करुन अफगाणिस्तान,पाकिस्तान, भारत, नेपाळ या देशात महिला दुचाकीवर एकांगी, एका बाजूने का बसतात याचं उत्तर तिने शोधलं.

ब्रिटिश इतिहासाशी काय संबंध?

पाकिस्तानची युट्यूबर झेनिथच्या मते, नेपाळ, पाकिस्तान, भारतात महिला दुचाकीवर एकांगी बसण्याची पद्धत सामान्य आहे. पण त्यामागे ब्रिटिश इतिहास आहे. झेनिथच्या मते हा ट्रेंड 14-15 व्या शतकात सुरू झाला. प्रिंसेस ॲन ऑफ बोहेमिया ही घोडेस्वारी करायची. त्यावेळी ती घोड्यावर एकाच बाजूने बसायची. त्याकाळी दोन पाय टाकून महिलांनी घोड्यावर बसणे अत्यंत असभ्य आणि परंपरेच्या विरुद्ध मानले जायचे. तिने 1600 किलोमीटरच्या परिसरात घोड्यावर एकांगी बसून रपेट मारली होती.

ही काही दक्षिण आशियाची संस्कृती नव्हती. भारताच्या वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांचे उदाहरण झेनिथने दिले आहे. राणी लक्ष्मीबाई या बहादुर महिला योद्ध्या होत्या. त्यांनी घोड्यावर दोन्ही बाजूंनी पाय टाकून लढाई लढली. इंग्रजांना जेरीस आणले. पण जेव्हा ब्रिटिश अंमल सुरू झाला आणि बाईक्स भारतीय रस्त्यावर धावू लागल्या. तेव्हा मात्र महिला एका बाजूला पाय करून बसू लागल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us