साप नेहमी जीभ बाहेर का काढतो? 99 टक्के लोकांना माहितीच नाही!

Snake Tongue Facts : साप सतत आपली जीभ बाहेर काढत असतो, बऱ्याच जणांना वाटते की साप जीभ बाहेर काढून समोरच्याला घाबरवत असतो किंवा तो रागावलेला असतो. मात्र यामागे वेगळेच वैज्ञानिक कारण आहे.

साप नेहमी जीभ बाहेर का काढतो? 99 टक्के लोकांना माहितीच नाही!
Why Snakes Stick Out Their Tongue
Image Credit source: Google
| Updated on: Jun 11, 2026 | 3:33 PM

साप पाहताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते आणि लोक सुरक्षित अंतरावर जाऊन थांबतात. कारण साप दिसला की त्याची सतत बाहेर-आत होणारी जीभ पाहून अनेकांना भीती वाटते. बऱ्याच जणांना वाटते की साप जीभ बाहेर काढून समोरच्याला घाबरवत असतो किंवा तो रागावलेला असतो. मात्र यामागे वेगळेच वैज्ञानिक कारण आहे. कारण सापांची पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता मर्यादित असते. त्यामुळे साप आसपासचे वातावरण समजून घेण्यासाठी, शिकार शोधण्यासाठी आपल्या जीभेचा वापर करतात. सापासाठी ही जीभ एका खास सेन्सरप्रमाणे काम करते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सापाची जीभ कशी काम करते?

साप जेव्हा जीभ बाहेर काढतो, तेव्हा हवेत असलेले अतिसूक्ष्म कण त्याच्या जीभेला चिकटतात. त्यानंतर तो जीभ पुन्हा तोंडात घेतो. हे कण तोंडाच्या वरच्या भागातील एका विशेष अवयवापर्यंत पोहोचतात. या अवयवाला वैज्ञानिक भाषेत जेकब्सन ऑर्गन किंवा व्होमेरोनाझल ऑर्गन असे म्हणतात. हा अवयव त्या कणांचे विश्लेषण करून मेंदूकडे संदेश पाठवतो. यामुळे सापाला त्याच्या आसपास शिकार आहे का, एखादा शत्रू आहे का किंवा कोणता अडथळा आहे का, याची माहिती मिळते.

सापाची जीभ दोन भागात विभागलेली असते

तुम्ही सापाची जीभ नीट पाहिली असेल तर तुम्हाला दिसले असेल की, सापाची जीभ ही दोन भागांमध्ये विभागलेली असते. याला फोर्क्ड टंग म्हणतात. जसे माणसाला दोन कान असल्यामुळे आवाज कोणत्या दिशेने येतो हे समजते, त्याचप्रमाणे सापाच्या दोन टोकांच्या जीभेमुळे वास किंवा धोका कोणत्या दिशेने आहे हे त्याला कळते. सापाच्या जीभेच्या उजव्या भागावर जास्त कण चिकटले तर सापाला समजते की शिकार किंवा वास उजव्या बाजूला आहे. त्यामुळे तो अचूक दिशा ठरवू शकतो. यामुळेच साप सतत जीभ आत बाहेर करत असतो.

जीभ नसती तर…

सापाच्या जीभेबाबत बोलायचे झाल्यास साप आपल्या जीभेने वास घेण्याचे काम करतो. कारण माणसांप्रमाणे हवेतले वास ओळखण्यासाठी त्याच्याकडे प्रभावी नाक नसते. जर सापाने जीभ बाहेर काढणे थांबवले, तर त्याला आसपासच्या वातावरणाची माहिती मिळणार नाही. त्याला रस्ता सापडणार नाही, शिकार शोधता येणार नाही आणि धोका ओळखणेही अशक्य होईल. त्यामुळेच साप आपली जीभ सतत आत-बाहेर करताना पहायला मिळतो.

 

Follow Us