AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Calling: 10 कशाला? 4 नंबर डायल करून लावा फोन; हे देश कोणते?

World Shortest Phone Number: जगातील काही देशात इतरांशी कॉल करण्यासाठी 15 अंकी क्रमांक डायल करावा लागतो हे ऐकताच कुणाचाही विश्वास बसणार नाही. तर काही देशांमध्ये केवळ चार आकडे डायल करून तुम्ही संपर्क साधू शकतात.

Calling: 10 कशाला? 4 नंबर डायल करून लावा फोन; हे देश कोणते?
चार अंकांचा मोबाईल क्रमांकImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 07, 2026 | 4:43 PM
Share

World Shortest Phone Number : भारतात मोबाईलवरून कुणाशीही संपर्क साधण्यासाठी 10 आकडी नंबर डायल करावा लागतो. त्याआधारे संपर्क साधता येतो. पण या देशामध्ये काही अवघे चार क्रमांक टाकून कुणाशीही संपर्क साधता येतो. तर काही देशात 15 आकडी मोबाईल क्रमांक डायल करून इतरांशी संपर्क साधता येतो. जगात काही देशात लांबलचक आकड्यांचा मोबाईल क्रमांक आहे. तर काही देशात हा क्रमांक चार आकड्यांचा आहे. कोणते आहेत हे देश?

लांबलचक फोन नंबरचे कारण काय?

World Population Review च्या 2026 मधील एका अहवालानुसार, जगातील दोन देशांमधील फोन क्रमांक केवळ 4 आकड्यांचे आहेत. तर काही देशांमध्ये 15 आकडे डायल केल्यावर समोरच्याचा नंबरवर संपर्क साधता येतो. प्रत्येक देशातील दूरसंचार व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. त्या देशाचा कोड, परिसराचा कोड आणि स्थानिक क्रमांक यांच्यामुळे या देशातील फोन नंबर एकतर लहान अथवा लांबलचक असतो.

15 आकड्यांचा फोन क्रमांक कोणत्या देशात?

सर्वात लांबलचक फोन क्रमांक, मोबाईल क्रमांक हा ऑस्ट्रेलिया या देशाचा आहे. हा देश लांबच लांब मोबाईल क्रमांक असलेला एकमेव देश म्हणून ओळखल्या जातो. ऑस्ट्रेलियात 15 आकड्यांचा मोबाईल क्रमांक असतो. तर त्यानंतर जर्मनी, स्वीडन आणि ऑस्ट्रियाचा क्रमांक लागतो. या देशातील मोबाईल क्रमांक 13 आकड्यांचा आहे. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनमधील मोबाईल क्रमांक 12 आकड्यांचा असतो. काही भागात हा क्रमांक कमी सु्द्धा आहे. भौगोलिक रचनेनुसार हा नंबर कमी जास्त होतो. तर अनेक देशात 10 क्रमांकाचा मोबाईल क्रमांक आहे. हा ट्रेंड भारत, अमेरिका, ब्राझिल, रशिया, जपानसह अनेक देशात आढळतो. येथील नागरिकांना 10 मोबाईल क्रमांक डायल करून इतरांशी संपर्क साधता येतो.

10 क्रमांकापेक्षा कमी आकडे

तर काही देशात 10 क्रमांकापेक्षा कमी नंबरचे मोबाईल क्रमांक आहेत. काही देशात 8 अथवा 9 इतके अंक असलेला, संख्या असलेला मोबाईल क्रमांक आहे. यामध्ये डेनमार्क, नॉर्वे, सिंगापूर आणि दक्षिण आफ्रिका या देशाचा समावेश आहे. या देशात मोबाईल क्रमांक छोटे असल्याने तो डायल करणे आणि लक्षात ठेवणे सोपे जाते. तर काही देशांमध्ये मोबाईल क्रमांक अवघ्या 5 आणि 6 आकड्यांचे आहेत.

केवळ 4 आकड्यांचा फोन नंबर

तर या अहवालानुसार, जगातील केवळ दोन देशातील मोबाईल क्रमांक हे चार अंकांचे आहेत. या देशातील नागरिकांना कुणाशीही संपर्क साधण्यासाठी केवळ चार आकडे दाबावे लागतात. चार क्रमांक डायल करावे लागतात. टोकलाऊ आणि निऊए या देशात केवळ चार अंकांचा मोबाईल क्रमांक डायल करून संपर्क साधता येतो.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?