राजस्थानमधील बेरोजगारांना महिन्याला 3500 रुपये मिळणार!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. राजस्थानमधील बेरोजगारांना 3500 रुपये बेरोजगारी भत्ता देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. या घोषणेनुसार, राजस्थानमध्ये जेवढे बेरोजगार आहेत, त्यांना 1 मार्चपासून खात्यामध्ये महिन्याला 3500 रुपये मिळतील. राजस्थान विद्यापीठाच्या कार्यक्रमात गहलोत यांनी ही घोषणा केली. सत्ता मिळाल्यानंतर बेरोजगारांना 3500 रुपये बेरोजगारी भत्ता […]

राजस्थानमधील बेरोजगारांना महिन्याला 3500 रुपये मिळणार!
Follow us on

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. राजस्थानमधील बेरोजगारांना 3500 रुपये बेरोजगारी भत्ता देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. या घोषणेनुसार, राजस्थानमध्ये जेवढे बेरोजगार आहेत, त्यांना 1 मार्चपासून खात्यामध्ये महिन्याला 3500 रुपये मिळतील. राजस्थान विद्यापीठाच्या कार्यक्रमात गहलोत यांनी ही घोषणा केली.

सत्ता मिळाल्यानंतर बेरोजगारांना 3500 रुपये बेरोजगारी भत्ता देऊ, असं काँग्रेसने जाहीरनाम्यात सांगितलं होतं. 1 फेब्रुवारीपासूनच दिवस मोजायला सुरुवात करा, 1 मार्चपासून पुढील दोन वर्षांपर्यंत बेरोजगारांना 3500 रुपये महिन्याला मिळतील, असं अशोक गहलोत म्हणाले. आतापर्यंत राजस्थानमध्ये बेरोजगारांना 600 रुपये बेरोजगारी भत्ता मिळत होता. हा भत्ताही मीच सुरु केला होता, असं त्यांनी सांगितलं.

निवडणुकीच्या काळात राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा केली होती. यासाठी एका मोहिमेंतर्गत काँग्रेस आणि एनएसयूआय (काँग्रेसची विद्यार्थी संघटना) च्या कार्यकर्त्यांनी बेरोजगारांकडून फॉर्मही भरुन घेतले होते. सरकार येण्याच्या दीड महिन्यातच आम्ही आश्वासने पूर्ण केली आहेत, याचाच अर्थ आम्ही दिलेल्या आश्वासनांप्रती किती गंभीर आहोत ते दाखवतं, असं गहलोत म्हणाले.

दरम्यान, काहींच्या मते, ही योजना लागू करणं राजस्थान सरकारसाठी एवढं सोपं नसेल. कारण भाजप आणि काँग्रेसनेही बेरोजगारांना भत्ता देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या तीन महिन्यातच जवळपास चार लाख तरुणांनी बेरोजगार म्हणून नोंदणी केली आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी पैसे जुळवत असलेल्या राजस्थान सरकारवर बेरोजगारी भत्ता हा एक मोठा भार असेल.