नांदगावमध्ये टरबूज खाल्ल्याने 45 जणांना विषबाधा

टरबूज खाल्ल्याने सुमारे 45 जणांना विषबाधा झाली आहे. ही धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील वसंतनगर येथे घडली. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

नांदगावमध्ये टरबूज खाल्ल्याने 45 जणांना विषबाधा
| Edited By: | Updated on: Jun 08, 2019 | 8:07 AM

जळगाव : टरबूज खाल्ल्याने सुमारे 45 जणांना विषबाधा झाली आहे. ही धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील वसंतनगर येथे घडली. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. विषबाधा झालेल्या सर्वांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गावात टरबूज घेऊन आलेल्या एका विक्रेत्याकडून ग्रामस्थांनी टरबूज घेतले होते. ते खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्वांना अचानक उलटी आणि जुलाबाचा त्रास झाला. यामुळे तातडीने सर्वांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये काहींनी विहिरीतील पाणी प्यायले होते, असं ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

विषबाधा झालेल्यांमध्ये काही रुग्णांवर गावात, काहींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींवर नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.